Download App

श्रेयसने सांगितलं महेश मांजरेकरांसोबतच्या कामाबद्दलचं गुपित; म्हणाला, ‘प्रेक्षकांना कायम…’

Shreyas Talpade On Mahesh Manjrekar : मराठीसह बॉलीवूड (Bollywood) मनोरंजनविश्वात श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade ) स्वत:ची एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काही दिवसांआधी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली होती. यानंतर मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात अभिनेत्यावर उपचार करण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संकटातून घरी परतल्यावर आता हळुहळू श्रेयसच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.

श्रेयस गेल्या काही दिवसांपूर्वी त्याच्या वाढदिवसानिमित्त पापाराझींसमोर आला होता. आता अभिनेता आजारपणानंतर लवकरच मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ ( Hee Anokhi Gaath Movie) या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली . यात श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले यांच्या प्रमुख भूमिका असून या चित्रपटाची कथा, पटकथा महेश मांजरेकर यांची आहे. (Marathi Movie) याशिवाय चित्रपटाचे संवाद गणेश मतकरी यांचे आहेत. ‘ही अनोखी गाठ’ च्या निमित्ताने महेश मांजरेकर आणि श्रेयस तळपदे ही जोडी पहिल्यांदा एकत्र येत आहेत. हा चित्रपट 1 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘Article 370’ आणि ‘क्रॅक: जीतेगा तो जीगा’मध्ये टक्कर, कोण ठरेल अव्वल?

खरं तर महेश मांजरेकर आणि श्रेयस गेली कित्येक वर्ष सिनेइंडस्ट्रीत काम करतायत, पण दोघांनी याआधीच कधीच एकत्र काम केलं नव्हतं. दरम्यान दिग्दर्शक महेश मांजरेकरसोबतच्या कामाबद्दल श्रेयसने पहिल्यांदाच भाष्य केले आहे. म्हणाला की, माणूस म्हणून त्यांच्यात काहीही बदल मला दिसला नाही. तो तसाच आहे, मी पहिल्यांदा त्यांना एकांकिकेमध्ये भेटलो होतो, त्यावेळेस त्यांनी नाटक करशील का? असं मला विचारणारा आजपण मला पिक्चर्स करतो का? असा विचारत असतो, त्यांच्या मला फरक आजिबात जवळ नाही, त्यांच्या पहिल्या फिल्म पासून आम्ही सर्वच चिल्लीपिल्ली होतोच. त्यांच्या प्रत्येक सिनेमातील स्टोरी टेलिंग आहे, महेश मांजरेकरांच प्लस पॉंईंट तो त्याच्या आडियन्सला एन्गेज ठेवतो, म्हणजेच प्रेक्षकांना कायम खेळवून ठेवतो. अनेक वेळेस असं होत की, काही गोष्टी तुम्हाला आवडतात किंवा नाही आवडतात, परंतु प्रेक्षकांना खेळवून ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि हीच कला त्यांच्यामध्ये आहे.

पुढे म्हणाला की, समजा आपल्याला अभिनेता म्हणून एखाद्या दिग्दर्शकासोबत काम करायचं आहे, मग ती गोष्ट काय, ती चांगली असेल तर आरे वा… आणि चांगला रोल असेल तर… आणखीनच आणि त्यावेळेस आपल्याला वाटत की, याच्या बरोबर काम करायचं आहे. आणि हे काम करताना महेश मांजरेकर रोज 2 गोष्टी ऐकवत असतो. आणि त्या नेहमीच चांगल्या असतात. तसेच काही गोष्टींना तुम्ही असता किंवा काही गोष्टींना तुम्ही नसता, पण तो सांगत राहतो, त्यामुळे तुमच्या बुद्धीमध्ये थोडी भर पडते.

follow us