Download App

Bollywood movie : ‘अंडरवर्ल्ड का कब्जा’ च्या निमित्त श्रिया सरनने व्यक्त केल्या भावना…

मुंबई : आनंद पंडित यांचा’अंडरवर्ल्ड का कब्जा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज आहे. प्रेक्षकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये सुपरस्टार उपेंद्र, किच्चा सुदीपा आणि श्रिया सरन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

या चित्रपटातील अभिनेत्री श्रिया सरन ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे ती दृश्यम 2 या चित्रपटामुळे. या चित्रपटाने चांगलं यश मिळवलं आहे. त्यांनंतर आता तिचा दुसरा चित्रपट आहे. हीने त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, मला माझ्या सर्व चित्रपट आणि प्रोजेक्टमध्ये प्रेक्षकांचं जे प्रेम मिळालं त्यामुळे माझा सन्मान झाला आहे. प्रेक्षकांच मनोरंजन करणं ही माझी नेहमीच प्राथमिकता असेल.

हेही वाचा : पनोरमा स्टुडीओजने मिळवले दृश्यमच्या रिमेकचे हक्क

गेल्या काही दिवसांरपूर्वी या चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालं. देखो आया धुरंधरा अस या गाण्याचं नाव असून हे गाणं स्निग्धजीत भौमिक आमि श्रुतिका समुद्रला यांनी गायलं आहे. स्निग्धजीत भौमिक यांनी विक्रम वेधाचं ट्रॅक ‘अल्कोहल’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर श्रुतिका समुद्रला ‘सा अरे गा मा पा 14′ ची विजेती होती.

या गाण्याचे बोल शब्बीर अहमद यांनी लिहिले आहे तर संगीत रवि बसरूर यांनी दिले आहे. चित्रपटाची निर्मीती श्री सिद्धेश्वरा एंटरप्राइजेज आणि अलंकार पांडियनच्या सहाय्याने आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. तर आर. चंद्रू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.’अंडरवर्ल्ड का कब्जा’ हा चित्रपट 17 मार्च, 2023 ला कन्नड, हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळममध्ये रिलीज होणार आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज