विपुल अमृतलाल शाह यांचं नवं म्युझिक लेबल लाँच; ‘शुभारंभ’ हे पहिलं गाणं सिध्दीविनायक मंदिरात केलं लाँच

क्रिएटिव्ह कार्य अधिक विस्तारत विपुल अमृतलाल शाह यांच्या नव्या म्युजिक लेबलचं पहिलं गाणं 'शुभारंभ' हे सिध्दीविनायक मंदिरात लाँच.

Untitled Design (30)

Untitled Design (30)

Shubharambh Song Launch At Siddhivinayak Temple : विपुल अमृतलाल शाह आता त्यांचं क्रिएटिव्ह कार्य अधिक विस्तारत आहेत. त्यांच्या बॅनर सनशाइन पिक्चर्स सोबत त्यांनी नवं म्युझिक लेबल ‘सनशाइन म्युझिक’ लाँच केलं आहे. प्रभावी सिनेमे आणि लक्षात राहतील असे साउंडट्रॅक्स तयार करण्यासाठी ओळखले जाणारे शाह आता एका नवीन क्षेत्रात प्रवेश करत आहेत. या लेबलचा उद्देश नवीन संगीत प्रतिभा शोधणे, त्यांना संधी देणे आणि त्यांना पुढे नेणे हा आहे.

लेबलची पहिली प्रस्तुती ‘शुभारंभ’ आज मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात (Siddhivinayak Temple) एका विशेष समारंभात लाँच करण्यात आली, जिथे विपुल अमृतलाल शाह आणि शेफाली शाह उपस्थित होते. ही सुरुवात खरोखर शुभ आणि हृदयाला भिडणारी वाटली. ‘शुभारंभ’ (Shubharambh) या गाण्याद्वारे सनशाइन म्युझिक पुढे कोणत्या प्रकारचं विविध आणि दर्जेदार कंटेंट देणार आहे, याची झलक मिळते.

जितेंद्र जोशी ‘मॅजिक’ चित्रपटात दिसणार एन्काउंटर स्पेशालिस्टच्या नव्या भूमिकेत; चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

या प्रकल्पाचे सह–निर्माता आशिन ए. शाह आहेत, तर म्युझिक हेड सुरेश थॉमस यांनी या पहिल्या मोठ्या रिलीजची क्रिएटिव्ह डायरेक्शन आणि संपूर्ण लाँच प्रक्रिया सांभाळली आहे. शाह यांच्या चित्रपटांना नेहमीच त्यांच्या सोलफुल आणि मधुर संगीतासाठी ओळखलं जातं. नमस्ते लंडन, लंडन ड्रीम्स,अ‍ॅक्शन रिप्ले आणि सिंग इज किंग सारख्या संगीतप्रमुख चित्रपटांना आजही त्यांच्या संगीतामुळे मोठी लोकप्रियता आहे.

विपुल अमृतलाल शाह नेहमीच परिणामकारक आणि विविध प्रकारच्या कथा सांगणारे सिनेमे बनवत आले आहेत. म्हणूनच त्यांना आज भारतीय मनोरंजन (Entertainment) उद्योगातील सर्वात आदरणीय आणि यशस्वी निर्मात्यांपैकी एक मानलं जातं.

Exit mobile version