Shyamchi Aai: राष्ट्रीय पुरस्कार (National Award) विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ (Shyamchi Aai) या मराठी सिनेमाच्या नव्या पोस्टरचं नुकतंच प्रदर्शित करण्यात आले आहे. (Marathi Movie) बहुचर्चित असलेल्या ‘श्यामची आई’ या मराठी सिनेमाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे. सुपरहिट ‘पावनखिंड’ या मराठी सिनेमाचे निर्माते भाऊसाहेब अजय -अनिरुद्ध आरेकर, आकाश पेंढारकर आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता आहेत.
यंदा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ‘श्यामची आई’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. (Social media)अमृता फिल्म्स निर्मित आणि आलमंड्स क्रिएशन प्रस्तुत ‘श्यामची आई’ या मराठी सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित ‘श्यामची आई’ या सिनेमाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची असणार आहे.
‘श्यामची आई’ या मराठी सिनेमात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे, तर सोबत गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ, संदीप पाठक, सारंग साठ्ये, मयूर मोरे, उर्मिला जगताप, भूषण विकास,सुनिल अभ्यंकर, अक्षया गुराव अशी मोठी स्टारकास्ट बघायला मिळणार आहे.
Rajinikanth यांचा लाल सलाम ‘या’ दिवशी होणार रिलीज; मुलगी ऐश्वर्यांनं केलं दिग्दर्शन
तसेच निर्मात्या अमृता अरुण राव यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक विषयांबद्दल वेगवेगळ्या सिनेमाची निर्मिती केली आहे. आणि कायम काहीतरी अनोखं करण्याच्या ध्यासानं पछाडलेला, तसंच बरेच पुरस्कार पटकावणाऱ्या तरुण दिग्दर्शक सुजय डहाकेनं ‘श्यामची आई’चं दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘श्यामची आई’ ही साने गुरुजींची कथा असल्यानं यात त्यांची व्यक्तिरेखा कोण असणार आहे याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.