Rajinikanth यांचा लाल सलाम ‘या’ दिवशी होणार रिलीज; मुलगी ऐश्वर्यांनं केलं दिग्दर्शन

Rajinikanth यांचा लाल सलाम ‘या’ दिवशी होणार रिलीज; मुलगी ऐश्वर्यांनं केलं दिग्दर्शन

lal salam film : अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांचा जेलर’ हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. अजूनही या चित्रपटाची चर्चा सुरूच आहे. जेलरची क्रेझ कमी होत नाही तोच आता रजनीकांतचा आगामी चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. रजनीकांत यांचे चित्रपट लार्जर दॅन लाइफ असतात. त्यांचे चाहते त्यांच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. रजनीकांत हे आता त्याची मुलगी ऐश्वर्याच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. ऐश्वर्या दिग्दर्शित ‘लाल सलाम’ (lal salam film) चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.

नगर दक्षिणेत पुन्हा विखे-गडाख; 1991 ची पुनरावृत्ती होणार? शंकरराव गडाखांनी सांगितलं 

लाल सलामच्या निर्मात्यांनी नुकतीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. पोंगलच्या मुहूर्तावर ‘लाल सलाम’ प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात रजनीकांत यांचा कॅमिओ असणार आहे. या चित्रपटात विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात क्रिकेटर कपिल देवचाही एक कॅमिओ असल्याचं बोलल्या जात आहे.

मे महिन्यात रजनीकांत आणि कपिल देव एकत्र चित्रपटाचे शूटिंग करताना दिसले होते. यापूर्वी या चित्रपटाचे पोस्टरही रिलीज करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये रजनीकांतचा यापूर्वी कधीही न पाहिलेला अंदाज पाहायला मिळत आहे.

लाल सलाम पोंगलला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे, अशी पोस्ट चित्रपटाच्या निर्मात्यांनी केली आहे. या चित्रपटातील गाणी ए आर रहमानने संगीतबद्ध केली आहेत. या चित्रपटात रजनीकांत यांनी ‘मोईदीन भाई’ची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना आपल्याला काळ्या शेड्स, डोक्यावर लाल टोपी आणि शेरवानीमध्ये रजनीकांतचा दमदार लूक पाहायला मिळणार आहे.

सुपरस्टार रजनीकांतचे देशातच नाही तर परदेशातही भरपूर चाहते आहेत. थलायवाच्या चित्रपटासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. रजनीकांत यापूर्वी 2021 मध्ये ‘दरबार’ आणि ‘अन्नाथे’ या चित्रपटात दिसले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube