Download App

Fighterच्या यशानंतर सिनेमाच्या सीक्वलची जोरदार चर्चा; दिग्दर्शकांकडून मोठा खुलासा

Fighter movie sequel: हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘फायटर’ (Fighter Movie) चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहेत. चित्रपटाच्या कथेपासून ते स्टारकास्टच्या अभिनयापर्यंत बरीच चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) देखील सतत चर्चेचा भाग असतो. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत जबरदस्त कलेक्शन केले आहे. फायटरच्या जबरदस्त यशानंतर दिग्दर्शकाने नुकतेच चित्रपटाच्या सिक्वेलबाबत मौन सोडले आहे.


फायटर बॉक्स ऑफिसवर (Fighter Box Office Collection ) चांगली कामगिरी करत आहे. पहिल्यांदाच रुपेरी पडदा शेअर करणाऱ्या दीपिका आणि हृतिकची केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अशा परिस्थितीत सिद्धार्थ आनंदने (iddharth Anand) फ्रँचायझीबद्दल दिलेला इशारा चाहत्यांसाठी मोठं गिफ्टपेक्षा कमी नाही. पिंकव्हिलाला दिलेल्या त्याच्या ताज्या मुलाखतीत, दिग्दर्शक म्हणाले की “हे जनता ठरवेल. बघू, फक्त तीन दिवस झाले आहेत.”

फायटरसंदर्भातील आपल्या योजनांचे वर्णन करताना सिद्धार्थ आनंद म्हणाले की, “मला वाटते की फायटरचा सिक्वेल बनवायचा की नाही हे प्रेक्षकांचे प्रेम ठरवेल. आम्हाला Fighter 2 एक मोठी कथा बनवायला नक्कीच आवडणार आहे. आमच्याकडे अनेक चांगल्या कल्पना आहेत, ज्यावर आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू.” पुढे, दिग्दर्शक म्हणाले की, त्याला सिक्वेलमध्ये काम करायला कधीच आवडत नाही. चित्रपटाचा दुसरा भाग न बनवणाऱ्या मोजक्या दिग्दर्शकांपैकी तो एक आहे. शीर्ष दिग्दर्शक नेहमीच सिक्वेलवर काम करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामुळे कदाचित काहीजण ते बनवत नाहीत.

Filmfare Awards 2024: ‘या’ कपलला मिळाला फिल्मफेअर, ’12th फेल’नेही मारली बाजी

अवघ्या चार दिवसांत 100कोटींचा टप्पा पार: 25 जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज झालेला हृतिक आणि दीपिकाचा फायटर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. चित्रपटाचा व्यवसायही चांगला आहे. 250 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत जवळपास 90 कोटींची कमाई केली होती. आता चौथ्या दिवशी चित्रपटाने भारतात 28.50 कोटींची कमाई केली आहे. यासह त्याचे भारतातील एकूण कलेक्शन 118 कोटी रुपये झाले आहे.

follow us