Download App

सिध्दार्थ आनंद यांनाही ‘डंकी’ची उत्सुकता, शाहरुखला शुभेच्छा देत म्हणाले, ‘मीही चित्रपट पाहणार’

  • Written By: Last Updated:

Dunki Film : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खा (Shah Rukh Khan) नवनवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पठाण, जवान या हिट चित्रपटानंतर शाहरुख खान आता ‘डंकी’ (Dunki) या बुहचर्चित चित्रपटात दिसणार आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या डंकी या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता आहे. हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी यांना त्यांच्या आगामी ‘डंकी’ चित्रपटासाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत.

X Down : मस्कचं X कोलमडलं! जगभरातील करोडो यूजर्सची टाईमलाईन Empty 

सिद्धार्थने यापूर्वी 2023 च्या ब्लॉकबस्टर ‘पठाण’मध्ये शाहरुख खानसोबत काम केले असून पाठाणने 100 कोटींहून अधिक कमाई केली होती. बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडत पठाण ब्लॉकबस्टर हीट ठरला होता. जगभरात1,050 कोटी रुपयांची कमाई करून त्याने अनोखा विक्रम केला आहे.

नाट्यप्रेमींसाठी पर्वणी! सृजन द क्रिएशनचे ‘मित्राची गोष्ट’ आणि ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ प्रेक्षकांच्या भेटीला

शाहरुखच्या डंकी सिनेमासाठी अनेक सिलेब्रिटी शुभेच्छा देत आहेत. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी देखील आपल्या भावना ट्विटरवर शेअर केल्या. त्यांनी पोस्ट करत लिहिलं की, फक्त एकदाच असा चित्रपट येतो ज्यामध्ये उस्ताद एकत्र येतात. जे त्यांच्या अनोख्या कलाकृतीने प्रेक्षकांची मनं जिकून घेतात. @iamsrk आणि राजू हिराणी सरांच्या चित्रपटाची खरोखरच वाट पाहत आहे. मी उद्या चित्रपटगृहात हसायला, रडायला आणि या चित्रपटचा अनुभव घ्यायला तयार आहे.

या शुभेच्छा खरच खास आहेत. कारण शाहरुख खानचा २०२३ मधला हा तिसरा चित्रपट येणार असून संपूर्ण भारतीय चित्रपट इंडस्ट्री यासाठी सज्ज आहे.

राजकुमार हिरानी यांनी मुन्नाभाई एमबीबीएस, पीके, संजू, 3 इडियट्स सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. चतुरस्त्र दिग्दर्शक म्हणून त्यांचा लौकिक आहे. आता त्याच्या डंकी या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटात शाहरुखसोबत तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर देखील चांगल्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

Tags

follow us