X Down : मस्कचं X कोलमडलं! जगभरातील करोडो यूजर्सची टाईमलाईन Empty

  • Written By: Published:
X Down : मस्कचं X कोलमडलं! जगभरातील करोडो यूजर्सची टाईमलाईन Empty

X Down : जगभरात करोडो लोक वापरत असलेली एलॉन मस्कच्या (Elon Musk) X चं सर्व्हर पुन्हा एकदा डाऊन झालं आहे. याचा फटका जगभरातील करोडो यूजर्सला बसला असून, त्यांची X ची टाईमलाईन एम्टी झाली आहे. सव्‍‌र्हर बंद होण्यामागे नेमकं कारण काय?  याबाबत कंपनीकडून कोणताही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भारतासह अनेक देशांमध्ये हे सर्व्हर डाऊन झाल्याने यूजर्सना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

पोपट दे अन् घटस्फोट घे; पतीचा पत्नीत नाहीतर पोपटात जीव, नेमका विषय काय?

X हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून जगातील एलॉन मस्कने ते विकत घेतल्यापासून चर्चेत आहे. मालकी हक्क मिळाल्यानंतर मस्कने याचे नाव बदलेले होते. या बदलानंतर करोडो यूजर्सने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती.

47,000 पेक्षा जास्त अमेरिकन यूजर्सना फटका

एक्स डाऊन झाल्यानंतर जगातील करोडो यूजर्सना अडचणींचा सामना करावा लागत असून, DownDetector या साईटने दिलेल्या माहितीनुसार, 47,000 पेक्षा जास्त अमेरिकन यूजर्सना अडचणींचा सामना करावा लागला आहे. अमेरिकेसोबतच अन्य देशांमध्येही सर्व्हर डाऊन झाल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जुलैमध्येही सर्व्हर डाऊन झाला होता

या वर्षी जुलैमध्ये यूएस आणि यूकेमधील वापरकर्त्यांना X सेवा डाउन झाल्यामुळे समस्यांना सामोरे जावे लागले होते. सर्व्हर डाउन झाले होते. याशिवाय  6 मार्च रोजी देखील X चा सर्व्हर काही तासांसाठी डाउन झाला होताय यामुळे यूजर्सना लिंक्स, इमेजेस आणि व्हिडिओ बघताना किंवा डाऊनलोड करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते.

आमच्याकडे कुणीही CM होऊ शकतो; फडणवीसांना स्वतःचं खेळला सेल्फ गोल

एलॉन मस्कच्या मालकीच्या प्लॅटफॉर्म असलेल्या एक्स ला गेल्या काही महिन्यांत अनेक वेळा तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला आहे. 14 डिसेंबर रोजी X वरील सर्व आउटगोइंग लिंक्सने अचानक काम करणे बंद केले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube