‘ती’ चूक अन् Elon Musk ने मागितली पियूष गोयल यांची माफी

‘ती’ चूक अन् Elon Musk ने मागितली पियूष गोयल यांची माफी

Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असेलेले एलन मस्क (Elon Musk) यांनी भारताचे केंद्रीय उद्योग आणि व्यापर मंत्री पियूष गोयल यांची माफी मागितली आहे. ते झालं असं की, मंत्री गोयल हे चा दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी कॅलिफॉर्नियातील फ्रेमोंटमध्ये अमेरिकन इलेक्ट्रीक वाहन कंपनी टेस्लाच्या प्लांटला भेट दिली.

Sam Bahadur : ‘सॅम बहादुर’च्या गाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणा

ही अमेरिकन इलेक्ट्रीक वाहन कंपनी टेस्ला म्हणजे एलन मस्क यांची कंपनी आहे. मात्र प्रकृती ठिक नसल्याने मस्क गोयल यांना टेस्ला प्लांटमध्ये भेटू शकले नाही. त्यामुळे त्यांनी थेट त्यांच्याच मालकीच्या असलेल्या एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर दिलगिरी व्यक्त करत भारताचे केंद्रीय उद्योग आणि व्यापर मंत्री पियूष गोयल यांची माफी मागितली आहे.

Israel Hamas War : पॅलेस्टीनी नागरिकांचाच हमासवर विश्वास नाही; इस्त्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा

काय म्हणाले एलन मस्क?

एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर दिलगिरी व्यक्त करताना एलन मस्क म्हणाले की, तुम्ही टेस्लाला भेट दिली हे आमचं भाग्य आहे. पण मी तेथे आजारी असल्याने तुमची भेट घेऊ शकलो नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण भविष्यात आपण नक्की भेटू असं मस्क म्हणाले. त्यांनी हा रिप्लाय पियूष गोयल यांनी टेस्ला भेटीची पोस्ट केली होती त्याला केला आहे.

काय म्हणाले होते पियूष गोयल?

टेस्लाला भेट दिल्यावर गोयल म्हणाले होते की, कॅलिफॉर्नियातील फ्रेमोंटमध्ये अमेरिकन इलेक्ट्रीक वाहन कंपनी टेस्लाच्या प्लांटला भेट दिली. मोटर वाहनाच्या जगात टेस्लाने मोठं योगदान दिलं आहे. भारतात देखील त्यांचं योगदान वाढत आहे. एलन मस्क यांची भेटीत कमतरता जाणवली. त्यांची प्रकृती लवकर ठिक व्हावी अशी प्रार्थना करतो. असं गोयल म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube