Israel Hamas War : पॅलेस्टीनी नागरिकांचाच हमासवर विश्वास नाही; इस्त्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा
Israel Hamas War : इस्त्रायल हमास यांच्यातील युद्ध अजूनही (Israel Hamas War) सुरुच आहे. आता तर युद्ध जास्तच भडकत चालले आहे. इस्त्रायलने गाझा पट्टीत (Gaza City) जोरदार हल्ले सुरुच ठेवले आहेत. जो पर्यंत हमासचा शेवटचा माणूस संपत नाही तोवर हे युद्ध सुरूच राहणार असल्याची भूमिका इस्त्रायलने घेतली आहे. त्यात आता इस्त्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी एक मोठा दावा केला आहे.
काय म्हणाले इस्त्रायलचे संरक्षणमंत्री?
इस्त्रायल हमास यांच्यातील युद्धा दरम्यान इस्त्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी एक मोठा दावा केला आहे. ते म्हणाले आहेत. की, हमास जरी पॅलेस्टाईनसाठी इस्त्रायलशी लढत असलं तरी आता पॅलेस्टीनी नागरिकांचाच हमासवर विश्वास राहिलेला नाही. कारण गाझामध्ये राहणारे पॅलेस्टीनी नागरिक हमासचे तळ लुटत आहेत.
Lalit Patil प्रकरणी निलंबित डॉक्टरांचा धक्कादायक दावा; म्हणाले डीनच्या आदेशानेच…
तसेच हमासचं गाझावरील नियंत्रण सुटलं आहे. 16 वर्षांनंतर हमासचं गाझावरील प्रभुत्व संपुष्टात आल्याचं दिसून येत आहे. आता पर्यंत इस्त्रायलच्या हल्ल्यात 11,240 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये 4630 लहान मुलांचा समावेश आहे. त्यानंतर आता इस्त्रायलच्या हल्ल्यामुळे गाझामधील रूग्णालयांमध्ये मृत्यूचं तांडवं मांडलं आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने इस्त्रायला युद्धविरामाचं आवाहन केलं आहे. त्यामुळे सुरक्षित रूग्णालयात जर एवढे मृत्यू होतं असतील जग शांत बसू शकत नाही. त्यामुळे तात्काळ युद्धविराम हवा आहे. असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने इस्त्रायला युद्धविरामाचं केलं आहे.
Animal Song : बाप-लेकाच्या नात्यावर आधारित ‘अॅनिमल’ सिनेमातील गाणं रिलीज
दुसरीकडे मात्र अमेरिकेसह अनेक राष्ट्रांकडून इस्त्रायलवर दबाव आणला जात आहे. दरम्यान, आतापर्यंत भारताने इस्त्रायलची बाजू घेतली होती. मात्र, संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) इस्रायलने पॅलेस्टिनी भूभागावर कब्जा केल्याचा निषेध करणारा ठराव मांडला होता. त्याला भारताने पाठिंबा दिला आहे. याशिवाय, तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीही भारताने केली आहे.