Animal Song : बाप-लेकाच्या नात्यावर आधारित ‘अ‍ॅनिमल’ सिनेमातील गाणं रिलीज

Animal Song : बाप-लेकाच्या नात्यावर आधारित ‘अ‍ॅनिमल’ सिनेमातील गाणं रिलीज

Papa Meri Jaan Song Release Out: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांमध्ये या सिनेमाची प्रचंड क्रेझ आहे.अ‍ॅनिमलमध्ये (Animal  Movie) रणबीरसोबतच रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) वडिलांच्या भूमिकेत बघायला मिळणार आहेत. रश्मिका आणि निर्मात्यांनी घोषणा केली होती की ते त्यांच्या सिनेमातील नवीन गाणे ‘पापा मेरी जान’ रिलीज झालं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir Kapoor (@ranbirkapooronline)


रिलीज होताच हे गाणे इंटरनेटवर धुमाकूळ घालू लागले आहे. गाण्यात रणबीर सोबत अनिल कपूर वडिलांच्या भूमिकेत बघायला मिळत आहे. गाण्यातून बाप आणि लेकाची रंजक अशी कहाणी असणार आहे. लांब केस असलेल्या रणबीरची ही स्टाईल मागील सर्व सिनेमापेक्षा वेगळी आहे. गाण्यामध्ये रणबीरला पाहून चाहते आता या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.

अ‍ॅनिमलचे दुसरे गाणे सतरंगा पाहिल्यानंतर समजणारी गोष्ट म्हणजे रणबीर घरी उशिरा येतो आणि त्याची बायको आणि मुले त्याची वाट पाहत झोपी गेल्याचे समजते. तर रश्मिका खुर्चीवरच झोपते. लाल सूटमध्ये रश्मिका अतिशय सुंदर बघायला मिळाली आहे. रणबीरला पाहून रश्मिका पटकन उठते आणि करवा चौथचा उपवास सोडण्यासाठी हातात चाळणी घेते. तेव्हा रणबीर तिला काही बोलतो आणि ती चिडते. रणबीर तिचे पाय धरून उपवास सोडण्यास सांगण्याचा प्रयत्न करतो. हे एक इमोशनल गाणे असून अरिजित सिंगने त्याला आवाज दिला आहे.

Shreyas Talpade: श्रेयस तळपदेने केली त्याच्या ‘अजाग्रत’ या पॅन इंडिया ब्लॉकबस्टरची घोषणा

या सिनेमातील हे दुसरे गाणे आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन संदीप वांगा रेड्डी यांनी केले आहे. रश्मिका पहिल्यांदाच रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हे गाणे करवा चौथच्या अगोदर रिलीज करण्याची निर्मात्यांची योजना अगदी योग्य आहे. अनिल कपूरनेही एनिमलमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. तर बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत आहे. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांची टी-सीरीज, मुराद खेतानीचा सिने१ स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी वंगा यांच्या भद्रकाली पिक्चर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट क्राईम ड्रामा प्रकारातील आहे.

अॅनिमल हा चित्रपट यापूर्वी 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र काही कारणास्तव या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube