Download App

Jhimma 2 Trailer: ‘आई होणं म्हणजे, बाई… ‘; ‘झिम्मा-2’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

  • Written By: Last Updated:

Jhimma 2 Trailer Release Out: ‘झिम्मा-2’ (Jhimma 2) या मराठी सिनेमाची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. ‘झिम्मा’ (Jhimma) या सिनेमाच्या यशानंतर झिम्मा-2 (Jhimma 2 Marathi Movie) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा धमाकेदार एक टीझर रिलीज करण्यात आला होता. आता या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमधील डायलॉग्स आणि कलाकारांच्या अभिनयानं चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.


झिम्मा-2 या सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात निर्मिती सावंत आणि सुचित्रा बांदेकर यांच्या एका सीनने होत आहे. या सीनमध्ये बघायला मिळत आहे की, निर्मिती सावंत या कार चालवत आहे, तितक्यात त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याचे बघायला मिळत आहे. त्यानंतर ट्रेलरमध्ये झिम्मा-2 या सिनेमातील एक-एक भूमिकांची माहिती देण्यात आली आहे. ट्रेलरमधील या कलाकारांच्या अभिनयानं चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

झिम्मा-2 या मराठी सिनेमाच्या ट्रेलरमध्ये महिलांसंबंधित काही डायलॉग्स आहेत. “फक्त आई होणं म्हणजे, बाई होणं नसतं”, या झिम्मा-2 या सिनेमाच्या ट्रेलरमधील निर्मिती सावंत यांच्या डायलॉगनं चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

सिद्धार्थ चांदेकरनं झिम्मा-2 या मराठी सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला त्यानं कॅप्शन दिलं आहे की, “त्या देऊन धडक आल्यात तडक… होऊन मोकाट आता! त्या सोडून फिअर टाकून गिअर झाल्यात सुसाट आता! सादर आहे आपल्या झिम्मा 2 चा ट्रेलर!धुड्डूऽऽऽम! 24 नोव्हेंबर पासून तुमचे आमचे REUNION चित्रपटगृहात…”

Tiger 3: भाईजानच्या फॅन्सनी चक्क सिनेमागृहात फटाके फोडत ‘टायगर 3’चे केले स्वागत

सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर या गेल्या भागातील कलाकारांसोबत आता रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोघी देखील या तगड्या स्टारकास्टमध्ये दाखल झाल्याचे बघायला मिळणार आहे. आणि या टीझरमध्ये त्यांची पात्रदेखील खूपच भन्नाट वाटत आहेत. ‘झिम्मा’ मधील या सात मैत्रिणींना प्रेक्षकांनी आपलेसे केले आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिटची मोहर उमटवली. महिलांना त्यांच्या अंतरंगाचा शोध या निमित्ताने घेता येणार आहे. आयुष्यात स्वतःसाठी काही क्षण देणे, किती आवश्यक आहे, याची जाणीव ‘झिम्मा’ने करून दिल्याचे सांगितले जात आहे. हेच ‘स्वत्त्व’ शोधायला लावणारा हा मराठी सिनेमा पुन्हा एकदा जोमाने आपल्या मैत्रिणींच्या भेटीला येत आहे. धमाल, मस्ती आणि मनोरंजनाचा फंडा नव्याने अनुभवायला आणि जगणं नव्याने एन्जॉय करायला शिकवणारा या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे.

Tags

follow us