Download App

Siddharth Jadhav: ‘लग्नकल्लोळ’ मधील अभिनयाबद्दल अभिनेत्याने भरभरून सांगितलं, म्हणाला…

Siddharth Jadhav On Lagnakallo Movie: मराठी मनोरंजनविश्वात गेल्या काही दिवसांपासून नवनवीन सिनेमाची घोषणा करण्यात येत आहे. (Marathi Movie ) मराठीसह बॉलीवूड गाजवणारा चाहत्यांचा लाडका ‘आपला सिद्धू’ म्हणजे सिद्धार्थ जाधव आता लवकरच एका नव्या अफलातून सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्याने नुकतच ‘लग्नकल्लोळ’ (Lagnakallo Movie) सिनेमाच्या प्रदर्शनानिमित्त लेट्सअप मराठीने सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) व त्यांच्या टीमशी खास संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या चित्रपटाबद्दल भरभरून माहिती दिली.

यावेळी बोलताना चाहत्यांचा लाडका सिद्धार्थ जाधव म्हणाला की, लग्नकल्लोळ हा सिनेमा माझ्या खूप जवळचा आहे. कलाकार म्हणून आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी होतात, त्या सिनेमात नाटकात पाहतो. त्या कधी अनुभवायला मिळतील का? किंवा याच गोष्टी आपल्या सिनेमातून अनुभवायला मिळाल्या तर, या पद्धतीची मसाला सिनेमा लवकरच पाहायला मिळणार आहे. सिनेमा पाहत असताना तुमचं मनोरंजन व्हालं, थोडं फील पण कराल, आणि सिनेमातील सर्वच कलाकार तुमच्या मनात घर करतील, या सिनेमाबद्दल खूप बोलून सुद्धा प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन या सिनेमातून तुम्हाला लवकरच महाराष्ट्राच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनवेळी अभिनेता खूपच उत्साही असल्याचे पाहायला मिळाले आहे.

सई परांजपे यांचं ‘इवलेसे रोप’ रंगभूमीवर; मंगेश कदम अन् लीना भागवत मध्यवर्ती भूमिकेत

या सिनेमात सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान दोघेही मुंडावळ्या बांधून वरमाला घेऊन सज्ज आहेत. मात्र दोघांपैकी कोण मयुरीच्या गळ्यात ही वरमाला घालणार, हे अद्याप गुपित स्पष्ट आहे. हे गुपित काल 1 मार्चला उलगडला आहे. चित्रपटात या प्रमुख कलाकारांसोबत अनेक दमदार कलाकार आहेत. हा लग्नाचा धमाका 1 मार्चला उडणार आहे. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे, आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, निर्माते डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणतात की, ” लग्न… हा विषय तसा म्हटला तर अतिशय जिव्हाळयाचा. हा विषय घेऊन अतिशय सुंदररित्या या चित्रपटाचे लेखन करण्यात आले आहे.

follow us