Singer Abhijeet Sawant expressed his feelings about the song “Kaale Badal” : प्रख्यात संगीतकार ललित पंडित यांनी संगीतबद्ध केलेले आणि जावेद अख्तर यांचे शब्द असलेलं ” काले बादल ” हे गाणं अभिजीतने सुरेल आवाजात गायलं !इंडियन आयडॉल पासून आजच्या तरुणाईला ज्याचा आवाजाची भुरळ पडतेय असा गायक अभिजीत सावंत आता पुन्हा एक नवीन हिंदी गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आजवर त्याने अनेक सुपरहिट गाणी गायन विश्वात एक ट्रेंड सेट केला आहे.
सरकारची फास्टट्रॅकची व्याख्या काय? त्याला हालहाल करत संपवा; नसरापूर प्रकरणावरून राज ठाकरेंनी फटकारले
संगीतकार जोडी जतीन-ललित मधील प्रख्यात संगीतकार ललित पंडित यांनी संगीतबद्ध केलेले आणि जावेद अख्तर यांचे शब्द असलेलं ” काले बादल ” हे गाणं अभिजीत ने सुरेल आवाजात गायलं आहे. या दिग्गज मंडळी सोबत गाणं करण्याचा अनुभव सांगताना अभिजीत सावंत सांगतो “आजवर अनेक गाणी केली पण जेव्हा पण अश्या प्रख्यात दिग्गज मंडळी सोबत गाणं करतो तेव्हा ती एक खूप मोठी जवाबदारी असते. काले बादल करताना थोडी धाकधूक होती कारण जावेद अख्तर यांनी शब्दबद्ध केलेलं गाणं गायलं मिळणं ही देखील एक पर्वणी होती आता हे गाणं सगळ्यांचा पसंतीस उतरल आहे हे बघून फार बरं वाटतं”
सर सुखाची श्रावणी, मोहब्बते लुटाऊंगा ते अगदी आता चाल तुरू तुरू , सखे गं साजणी अश्या अगणित गाण्यांमधून अभिजीतच्या जादुई आवाजाने प्रेक्षक कायम मंत्रमुग्ध झाले आहेत. इथवर न थांबता अगदी आताच्या जेन झी च्या मनावर देखील त्याने अधिराज्य गाजवल आहे.
पत्नीच्या खुनाचा प्रयत्न..मुलाला मारहाण, भाजप मंत्र्यांच्या OSD वर पुण्यात गुन्हा दाखल…
“काले बादल” पुन्हा एकदा प्रेक्षकांना अभिजीतचा सुमधुर आवाज अनुभवयाला मिळतोय आणि तो पुन्हा चर्चेचा विषय ठरतोय. भविष्यात अभिजीत अजून बड्या प्रोजेक्ट्सचा भाग होणार असल्याचं कळतंय.
