Singer Abhijeet Sawant Shares Experience Of Kashi Trip : सुरेल आवाजाने प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेला आणि तरुणाईचा लाडका गायक (Entertainment News) म्हणजे अभिजीत सावंत. अभिजीत कायम नवनवीन (Abhijeet Sawant) माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. मग ते कधीतरी गाणं असू दे किंवा बिग बॉस सारखा रियालिटी शो, तो कायम चर्चेत राहणारा गायक ठरला. फक्त गायक नाही, तर अभिनय क्षेत्रात देखील काम करण्याची इच्छा त्याने अनेक मुलाखतीमधून बोलून दाखवली आहे.
महाराष्ट्रात पावसाचा रुद्रावतार; अनेक ठिकाणी शेती अन् घर जलमय, पाहा काही फोटो
‘चाल तुरु तुरु’ सारख्या जुन्या एव्हर ग्रीन गाण्याला (Tuzi Chal Turu Turu) एका नवा ट्विस्ट देत हे गाणं अभिजीत प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला. या गाण्यानं संपूर्ण सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. यूट्यूबपासून इंस्टाग्रामपर्यंत हे गाणं ट्रेंडिंग ठरलं.
गाण्याचा व्हायरल होण्यानंतर आता अभिजीत अनेक ठिकाणी त्याचा कॉन्सर्ट आणि गाण्याचा कार्यक्रमासाठी प्रवास करतोय. अश्यातच अभिजीत नुकताच काशीमध्ये जाऊन पोहचला. कामानमित्ताने अभिजीत काशीमध्ये असताना त्याने ‘काशी विश्वनाथ मंदिरात’ जाऊन खास आशीर्वाद घेतला आहे.
न्याय मिळायला थोडा वेळ लागेल पण ‘मी पुन्हा येईन’; पूजा खेडकर यांनी सांगितली ‘ती’ A टू Z स्टोरी
याबद्दल बोलताना अभिजीत सांगतो, कधीतरी आपण नकळत एखाद्या ठिकाणी येऊन पोहचतो. काशी हे असं एक ठिकाण आहे, जिथे येऊन खरंच निव्वळ समाधान मिळतं. कामाच्या निमित्तानं आज इथे येणं झालं असलं, तरी काशी फिरणं हा एक सुंदर अनुभव आहे. इथल्या गल्ल्या घाटाकडे जाणारे रस्ते सगळचं अद्भुत आहे. येणाऱ्या काळात अभिजीत गाण्याचा सोबतीने अभिनय देखील करणार का? हे बघणं उत्कंठावर्धक तर ठरणार आहे.