VIDEO : विमानात देखील मला गाण्याचा मोह आवरत नाही, असं का म्हणतोय अभिजीत? बघाच…

Singer Abhijit Sawant Wishes on World Music Day : गायक अभिजीत सावंतने (Abhijit Sawant) घराघरात जाऊन स्वतःच्या आवाजाने प्रेक्षकांची मन जिंकली. अभिजीत गाण्याच्या सोबतीने प्रेक्षकांना रियालिटी शोमध्ये देखील (World Music Day) दिसला. गाणं आणि अभिनय या दुहेरी भूमिका तो आज उत्तम पद्धतीने पार पाडताना दिसतोय. अभिजीत सावंतने जागतिक संगीत दिनाच्या मजेशीर शुभेच्छा (Entertainment News) दिल्या […]

Entertainment News (22)

Entertainment News (22)

Singer Abhijit Sawant Wishes on World Music Day : गायक अभिजीत सावंतने (Abhijit Sawant) घराघरात जाऊन स्वतःच्या आवाजाने प्रेक्षकांची मन जिंकली. अभिजीत गाण्याच्या सोबतीने प्रेक्षकांना रियालिटी शोमध्ये देखील (World Music Day) दिसला. गाणं आणि अभिनय या दुहेरी भूमिका तो आज उत्तम पद्धतीने पार पाडताना दिसतोय. अभिजीत सावंतने जागतिक संगीत दिनाच्या मजेशीर शुभेच्छा (Entertainment News) दिल्या आहेत.

पाकिस्तानचा अमेरिकेला गोंजारण्याचा प्रयत्न; नोबेल शांतता पुरस्कारासाठी दिला ट्रम्प यांना पाठिंबा

2005 पासून अभिजीतच्या संगीत प्रवासाची सुरुवात (Abhijit Sawant Video) झाली. आज 20 वर्षांनी देखील तो रसिक प्रेक्षकांचा तेवढाच आवडता गायक राहिला आहे. इंडियन आयडॉलचा पहिला विजेता ते आजच्या काळात जेन झीपासून मिलेनियर भुरळ घालणारं, त्याच संगीत हे चर्चेत आहे.

अभिजीत कायम त्याच्या नवनवीन गाण्यामुळे चर्चेत असतो. तितकाच तो सोशल मीडियावर सगळे ट्रेंड फॉलो करताना दिसतो. आजच्या जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधत असा एक काहीसा मजेशीर व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर करून संगीत दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या अभिजीत पॅरिस ट्रीपवर फिरताना दिसतोय. त्याने विमानात देखील आपल्याला संगीताचा मोह आवरत नसल्याचं कॅप्शन मध्ये लिहिलं आहे.

यंदाचा योग दिवस अमृतासाठी ठरला खास ! केदारनाथचं दर्शन आणि सापडलेला जादुई क्षण

हा गंमतीशीर व्हिडीओ त्याने पोस्ट केला असून नेटकऱ्यांनी देखील त्यावर भन्नाट कॉमेंट्स केल्या आहे. एकंदरीत काय आजच्या तरुणाईला देखील अभिजीतच गाणं तेवढंच पसंतीस पडतंय. तो मिलेनियर्स सोबतीने जेनझीचा सुद्धा आवडता गायक बनला आहे. येणाऱ्या काळात अभिजीत अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स करणार असल्याचं कळतंय.

 

Exit mobile version