Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रँड सेलिब्रेशन होणार!

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रँड सेलिब्रेशन होणार!

Bigg Boss Marathi Season 5 Day 66 : ‘बिग बॉस मराठी’चा आजचा (Bigg Boss Marathi) भाग खूप विशेष असणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चा सध्या शेवटचा आठवडा सुरू असून आज घरात ‘आपला माणूस’ शिव ठाकरे (Shiv Thackeray) स्पेशल गेस्ट म्हणून (Bigg Boss Marathi Season 5) जाणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासातात पहिल्यांदाच ग्रँड सेलिब्रेशन होणार आहे. समोर आलेल्या प्रोमोमधील अभिजीत सावंतचा (Abhijit Sawant) अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणत आहेत,”आपल्या प्रसिद्धीचा कुठलाही बडेजाव न करता, सगळ्यांत मिळून मिसळून वागणारा, कधी गाणी गाऊन मंत्रमुग्ध करणारा अभिजीत सावंत”. ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वातील ग्रँड सेलिब्रेशनमध्ये होणारं कौतुक ऐकून अभिजीतचेही डोळे पाणावले. प्रोमोमध्ये अभिजीत म्हणतोय,”या शोने खूप काही दिलंय”. ‘बिग बॉस मराठी’चा आजचा भाग खूपच वेगळा असेल. ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडणार आहे जे प्रेक्षकांना आजच्या विशेष भागात पाहायला मिळेल.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, घरातली सर्व सदस्य गार्डन एरियात उभे असुन बिग बॉसची सूचना ऐकत आहेत. बिग बॉस म्हणाले,” आज महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशात प्रत्येक मराठी कुटुंब या घरात जगलेल्या क्षणाचे साक्षीदार आहेत. आता बिग बॉसने ठरवले आहे की, घरातील प्रत्येक सदस्यांच्या प्रवासाचे भव्य सेलिब्रशन करणार आहे. ते पण हटक्या स्टइलने आणि आजचे सेलिब्रेशन बिग बॉसच्या घरात सर्वात भव्य सेलिब्रेशन असणार आहे.

Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या घरात आज ठरणार सदस्यांची किंमत

अभिजीतने मांडले सुरज विषयी स्पष्ट मत

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, DP दादा, सुरज आणि अभिजित गार्डन एरियात बसले असताना DP दादा अभिजितला म्हणाले,” तू मला सांग की, घरामध्ये वावरणे, कोणत्या गोष्टीमध्ये ठाम पणे मुद्दे मांडणे, डिसिजन मेकिंग, एखाद्या गोष्टीमध्ये भाग घेणे, टास्क खेळताना स्ट्रॅटर्जी आखणे. या सगळ्यांमध्ये मी खरच १ लाखाच्या योग्यतेचा आहे का..? आणि सुरज 6 लाखांच्या योग्यतेचा आहे का..? यावर अंकीता अभिजितला म्हणाली,” तुला सुरज या योग्य वाटतो का..? या सगळया गोष्टींमध्ये आम्हाला तू सुरजला बसवून दाखव.

यावर अभिजित म्हणाला,” मला वाटते की, सुरजमध्ये खूप बदल झाला आहे.त्याने प्रत्येक वेळी टास्कमध्ये 100 टक्के देऊन पुर्ण जिद्दीने गेम खेळला आहे.तुम्ही कितीही बोला की, सुरजला कळत नाही. पण त्याने प्रत्येक टास्क पूर्ण केला आहे. शेवटच्या टास्कमध्ये पण त्याने जास्त झेंडे आणले होते.”

follow us
  • fb
  • instagram
  • youtube