Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या घरात आज ठरणार सदस्यांची किंमत
Bigg Boss Marathi Season 5 Day 65 : ‘बिग बॉस’ मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) आजच्या भागामध्ये तुम्ही पाहू शकता, बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi) आदेशानुसार प्रत्येक सदस्याला स्वतःची किंमत ठरवावी लागणार आहे. अभिजीत म्हणाला, (Abhijeet Sawant) दोन लाखांची पाटी मी अंकिताला (Ankita Walawalkar) देईन. यावर निक्की (Nikki) अभिजीतला म्हणाली, “मग तू चाळीस हजाराची पाटी जान्हवीला देणार आहेस का?” अभिजीत निक्कीला म्हणाला, “माझ्याकडे ऑप्शन नाही आहे.” यावरून डीपी दादा अभिजीतला म्हणाले, “मला ही वाटतं की तू ही गोष्ट करावीस.” यावरून जान्हवी बिग बॉस यांना उद्देशून म्हणाली, “या घरातील चाळीस हजारांची किंमत माझी नाही . मी चाळीस हजाराची पाटी स्वीकारणार नाही. आता त्यामुळे आज कोणाची किंमत किती ठरणार, हे पाहाताना मजा येणार आहे.
View this post on Instagram
अंकिताचा चढला पारा
बिग बॉस’ मराठीच्या आजच्या ‘UNSEEN UNDEKHA’ मध्ये तुम्ही पाहू शकता, अंकिता आणि अभिजीतमध्ये वादावादी झालेली दिसत आहे. अंकिता अभिजीतला म्हणाली, “तिला डायनिंग टेबल देऊन तू संपूर्ण बाथरूम साफ करणार आहेस!” यावर अभिजीत म्हणाला, “तुला जर एवढे वाटत आहे ना की तुझ्या ड्यूटीज जास्त आहेत तर तू निक्कीला बोलना” यावर अंकिता म्हणाली, तू नेहमी जेंटलमॅन बनून फिरत असतो ना, मग आज पण जेंटलमॅन बन.’’त्यावर अभिजीत अंकिताला म्हणाला, ‘मी माझी ड्युटी माझ्या सुविधेप्रमाणे घेतो. यामध्ये मी चुकीचा काय आहे.” यावरून अंकिताचा राग अनावर झाला.
पंढरीनाथ कांबळेने घेतला निरोप
पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळे मराठी मनोरंजनसृष्टीतील एक विनोदी अभिनेता आहे. हास्यसम्राट पंढरीनाथ कांबळेने मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम केलं आहे. वेगवेगळी कॅरेक्टर्स करणारा हा माणूस स्वतःच एक कॅरेक्टर आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातदेखील त्याच्या या कॅरेक्टरने प्रेक्षकांची मने जिंकली.
Bigg Boss Marathi: टबिग बॉस मराठीटच्या घराचा पंढरीनाथ कांबळेने घेतला निरोप
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सर्वच सदस्य या आठवड्यात नॉमिनेट होते. त्यामुळे निक्की, सूरज या सदस्यांना कालच्या भागात सेफ करण्यात आलं. ‘बिग बॉस मराठी’चा खेळ अंतिम टप्प्यात आलेला असताना या आठवड्यात घरातून कोण बाहेर पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अंकिता आणि पॅडी दादा या दोन सदस्यांमध्ये शेवटी चुरस रंगली. यापैकी अंकिताला ‘बिग बॉस’ने सेफ केलं. तर प्रेक्षकांनी दिलेल्या मतांचा मान ठेवत पंढरीनाथ कांबळेला या आठवड्यात घराचा निरोप घ्यावा लागला. खरंतर ‘बिग बॉस मराठी’च्या माध्यमातून एक वेगळाच पॅडी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि आता पंढरीनाथ कांबळेने निरोप घेतला आहे.