Singer Arjit Singh’s Restaurant : लोकप्रिय गायक अरिजीत सिंग हा करोडो लोकांच्या मनावर राज्य करतो. (Restaurant) त्याचा आवाज त्याच्या चाहत्यांच्या हृदयाला स्पर्श करतो. आपल्या गाण्यांनी जगभरातील लोकांची मने जिंकल्यानंतर, अरिजीत सिंग त्याच्या उदारतेने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. आता त्याच्या चाहत्यांना आणखी एक भेटवस्तू दिली आहे. त्याने जे केलं आहे ते पाहून चाहच्यांच्या मानातील त्याचा आदर आणि प्रेम अजून वाढलं आहे.
अरिजीतच्या रेस्टॉरंटची सर्वत्र चर्चा
अरिजीतने एक रेस्टॉरंट उघडले आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्या रेस्टॉरंटमध्ये फक्त 40 रुपयांत जेवण मिळतं. अरिजीत सिंगने सामान्य लोकांसाठी ‘हेशेल’ नावाचं रेस्टॉरंट उघडले आहे. पश्चिम बंगालमधील अरिजीतच्या मूळ गावी मुर्शिदाबाद येथील जियागंज येथे त्याने हे रेस्टॉरंट सुरु केलं आहे. या रेस्टॉरंटमध्ये फक्त 40 रुपयांत एक व्यक्ती पोटभर जेवू शकतो असं म्हटले जातं.
प्रवाशांना मोठा दिलासा! भारत-पाक युद्धबंदीनंतर 32 विमानतळं पुन्हा सुरू; नोटम जारी
हे रेस्टॉरंट नवीन पद्धतीचे नाही. हे अरिजित सिंगचे जुने रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट त्यांचे वडील गुरुदयाल सिंग हे रेस्टॉरंट सांभाळतात. सामान्य लोकांना कमी किमतीत स्वादिष्ट आणि पौष्टिक अन्न खाता यावा, पोटभर जेवण मिळावं हाच त्या मागचा हेतू आहे. बहुतेक सेलिब्रिटी हाय-फाय रेस्टॉरंट्स उघडतात, परंतु अरिजीतच्या या उपक्रमाने सर्वांचे मन जिंकले आहे.
सर्वत्र अरिजीतचं कौतुक
अरिजीत सिंगसारख्या करोडपतीसाठी धर्मादाय रेस्टॉरंट चालवणे ही मोठी गोष्ट नाही पण चाहत्यांना अजूनही प्रश्न पडत आहे की ही बातमी खरोखर खरी आहे का? एका रिपोर्टनुसार त्याचे हे रेस्टॉरंट सामान्य लोकांना परवडणारे आहे हे खरे असले तरी, जेवणाच्या किमतीबद्दल अंदाज लावले जात असले तरी जेवणाची किंमत स्पष्ट नाही. रेस्टॉरंटमध्ये 40 रुपयांना जेवण मिळत असल्याच्या व्हायरल बातमीला कोणताही ठोस दुजोरा मिळालेला नाही.