आत्महत्येच्या अर्धा तास आधी चौघांना फोन, दिवसभरात 27 कॉल्स; डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी मोठं अपडेट

Dr Shirish Valsangarkar Case 27 phone called On 18 April : प्रसिद्ध मेंदूविकास तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या (Dr Shirish Valsangarkar) आत्महत्येचा घटनेला आज बारा दिवस उलटले आहेत. परंतु, अजूनही पोलीस अजूनही आत्महत्येमागे नेमके कोणते कारण होते, हे शोधू शकलेले नाहीत. परंतु डॉ. वळसंगकर यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली होती. यावरून मुख्य आरोपी मनीषा मुसळे-मानेच (Dr Shirish Valsangarkar Case) असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. परंतु पोलिसांनी डॉ. वळसंगकर यांच्या मोबाईल कॉलचा सीडीआर काढला आहे. यावरून 18 एप्रिल रोजी डॉ. वळसंगकरांनी केलेल्या अन् त्यांना आलेल्या कॉल्सची संख्या 77 असल्याचं समोर आलं. त्यांनी आत्महत्या करण्याच्या अर्ध्या तासापूर्वी चौघांना फोन केल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. धमकी प्रकरणी तिने डॉ. वळसंगकर यांच्यासह त्यांची पत्नी उमा आणि मुलगा डॉ. अश्विन यांना मेल करून माफीनामा दिला होता. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी टोकाचं पाऊल का उचललं? त्यांना नेमका कोणता त्रास होता? आत्महत्येमागील कारण न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल करण्यापूर्वी पोलिसांना शोधावं लागणार आहे.
काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळे बंद, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोठा निर्णय
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी तपासाची सुत्र वेगाने फिरत आहे. पोलिसांनी त्यांच्या फोन-कॉल्सचा सीडीआर रिपोर्ट मिळवला असून सीडीआर तपासणी सुरू आहे. डॉ. वळसंगकर वैयक्तिक अन् हॉस्पिटलचे काम असे दोन मोबाईल फोन वापरत होते. या दोन्ही मोबाईलचा सीडीआर पोलिसांनी काढलाय. यात मनीषा मुळसे माने हिने त्यांना 18 एप्रिल रोजी फोन केल्याचं समोर आलं नाही.
काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळे बंद, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोठा निर्णय
आत्महत्येच्या दिवशी डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलवर एकूण 27 फोन कॉलची नोंद झाली आहे. गोळी झाडून घेण्याच्या अर्धा तासापूर्वी डॉ. वळसंगकर त्यांनी चौघांना फोन केल्याचे समोर आलंय. या सर्व लोकांची चौकशी केल्यानंतरच तपासाला दिशा मिळणार आहे, असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ह डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या खिशात सापडलेली चिठ्ठी, त्यांची मराठीतील इतर कागदपत्रे पुण्यातील हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविण्यात आली आहेत. यावरील हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल येण्यासाठी किमान दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती मिळतेय.