Mahesh Kale : ‘हा तर रेहमानच्या जीवावर उठलाय’; नेटकऱ्यांकडून महेश काळे ट्रोल

Mahesh Kale Trolled by users After Making fusion of Roja Song : आपल्या आवाजाच्या जादूने रसिक प्रेक्षकांना भुरळ घालणारा गायक म्हणजे महेश काळे होय. महेशने आपल्या आवाजाने तरुणाईला देखील शास्त्रीय संगीताकडे वळवले आहे. ‘घेई छंद मकरंद’ किंवा ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ या गाण्यांनी त्याने रसिक प्रेक्षकांना मोहून टाकले आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमामधील महेशच्या […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 29T172721.864

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 29T172721.864

Mahesh Kale Trolled by users After Making fusion of Roja Song : आपल्या आवाजाच्या जादूने रसिक प्रेक्षकांना भुरळ घालणारा गायक म्हणजे महेश काळे होय. महेशने आपल्या आवाजाने तरुणाईला देखील शास्त्रीय संगीताकडे वळवले आहे. ‘घेई छंद मकरंद’ किंवा ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ या गाण्यांनी त्याने रसिक प्रेक्षकांना मोहून टाकले आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमामधील महेशच्या गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरश वेड लावले होते.

महेश हा कायम आपल्या गाण्यांचे व्हीडीओ त्याच्या सोशल मीडियाच्या हँडेलवर टाकत असतो. देशातील व परदेशातील कार्यक्रमांमधील गाण्याचे व्हिडीओ महेश शेअर करत असतो. त्याच्या कार्यक्रमांना वयोवृद्ध लोकांसह तरुण मुले देखीत तितक्याच प्रमाणात उपस्थित राहत असतात. सध्या महेश सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होतो आहे.

घराणेशाहीच्या मुद्द्यावरून कंगणा राणौत भडकली, म्हणाली, “गँग करुन…”

महेशचे ट्रेंड होण्याचे कारण हे वेगळे आहे. महेश हा सोशल मीडियावर सध्या ट्रोल होतो आहे. त्याचे झाले असे की, महेशचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये महेश ‘रोजा जाने मन’ हे बॉलिवुडचे गाणे गाताना दिसत आहे. यानंतर लगेचच तो शब्दांच्या पलिकडले हे गाणे गात आहे. यावरुन त्याला चांगलेच ट्रोल केले आहे.

यामध्ये दीपक पवार या यूजरने म्हटले आहे की, ‘महेश काळे आता ऐ. आर. रेहमानच्या जीवावर उठलाय’, तर शशांक प्रतापवार या एका दुसऱ्या यूजरने म्हटले आहे की, ‘ओ महेश भाऊ, रमजान चालू झालाय तर कृपया रोजाची वाट लावू नका’, अशा शब्दात नेटकऱ्यांनी महेशला ट्रोल केले आहे.

 

याआधी देखील महेशाल यूजर्सने ट्रोल केले आहे. भीमसेन एकच होऊ शकतात. तू तर नाकात गातोस, एवढं कर्कश, कोण एकतो तुला, असे म्हटले होते. यावरुन महेशने देखील तितकेच जोरदार उत्तर त्याला दिले होते. खरं आहे, एकच होऊ शकतात ते. असाच आवाज दिलाय देवाने काय करु. तरी लोक का ऐकताता ते कळत नाही, असे उत्तर त्या ट्रोलरला दिले होते.



दरम्यान, महेशचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामध्ये तो पंजाब येथे एका कार्यक्रमात पंजाबी प्रेक्षकांसमोर ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, गाणे गायले आहे. यानंतर तेथील उपस्थित लोकांनी महेशच्या अंगावर फुलांची उधळण केल्याचे दिसते आहे.

Exit mobile version