Smita Jaykar: स्मिता जयकर यांच्याबद्दल मिलिंद गवळींची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…

Smita Jaykar Book Launch Milind Gawali Post: देवदास, हम दिल दे चुके सनम अशा हिंदी चित्रपटातून आणि अनेक मराठी चित्रपटातून काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर (Smita Jaykar) यांचं आत्मचरित्र मी स्मिता जयकर वाचकांच्या भेटीला आले आहे. (Smita Jaykar Book Launch) त्यानिमित्ताने आई कुठे काय करते या सिरियलचा फेम अभिनेता मिलिंद गवळी यांनी स्मिता जयकर […]

Smita Jaykar

Smita Jaykar

Smita Jaykar Book Launch Milind Gawali Post: देवदास, हम दिल दे चुके सनम अशा हिंदी चित्रपटातून आणि अनेक मराठी चित्रपटातून काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर (Smita Jaykar) यांचं आत्मचरित्र मी स्मिता जयकर वाचकांच्या भेटीला आले आहे. (Smita Jaykar Book Launch) त्यानिमित्ताने आई कुठे काय करते या सिरियलचा फेम अभिनेता मिलिंद गवळी यांनी स्मिता जयकर यांच्याविषयी एक खास पोस्ट (Milind Gawali Post) लिहिली आहे.


मिलिंद गवळी लिहितात.. “ मी स्मिता जयकर “ पुस्तक पुण्यात प्रकाशित झालं. नियती कसा खेळ खेळत असते बघा, एखाद्या व्यक्तीची आपल्याला नियतीला जर भेट घालून द्यायची असेल तर कशीही काहीही करून ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येतेच येते, पंचवीस तीस वर्षांपूर्वी रमेश साळगावकर नावाचे दिग्दर्शक माझ्याकडे “सत्वपरीक्षा” नावाचा सिनेमा घेऊन आले होते, या चित्रपटांमध्ये मला त्यांनी एक भूमिका याचा आग्रह केला होता, लक्ष्मीकांत बेर्डे हिरो, रेशम टिपणीस हीरोइन आणि मला व्हिलन चा रोल त्यांनी ऑफर केला होता, मी विलन आहे म्हणून मी तो रोल स्वीकारला नाही आणि तो चित्रपट केला नाही.

या चित्रपटामध्ये स्मिता जयकर त्या विलनच्या आई ची भूमिका करत होत्या, त्यांना भेटायची त्यांच्याबरोबर काम करायची संधी माझी गेली. त्यांची आणि माझी भेट व्हायचीच होती म्हणून सात आठ वर्षानंतर देवकी चित्रपटांमध्ये त्यांनी पाहुणी कलाकार म्हणून एक दिवसाचं काम केलं. ईतक्या वर्षांने नियतीने आमची गाठ घालून दिली, पण फक्त काही तासांसाठी, फार ओळख ही झाली नाही आमची, मग दहा एक वर्षानंतर अर्चना नेवरेकर फाउंडेशनच्या सांस्कृतिक कला दर्पण कार्यक्रमांमध्ये आम्ही नाटक आणि सिनेमा याचे परीक्षक म्हणून एकत्र आलो .

“देव बाभळी” “अनन्या” अशी सुंदर सुंदर नाटक एकत्र बसून बघितली , त्या नाटकांवर चर्चा केली योग्य त्या लोकांना बक्षीस दिली, या सगळ्या प्रवासामध्ये आमची एक छान निखळ मैत्री ही झाली, नियती कसा खेळ खेळते बघा , “सत्व परीक्षा” मध्ये मला विलन चा रोल दिला होता म्हणून मी तो स्वीकारला नव्हता पण आजच्या तारखेला अनिरुद्ध देशमुख सारखा विलन मी सलग तीन वर्ष करतो आहे आणि आणि डोक्याचा भुगा झाला असल्याने ते डोकं ठिकाणावर ठेवण्यासाठी स्मिताजीच मला सातत्याने मदत करतात. या वाल्याचा वाल्मिकी होण्याचा मार्ग स्मिताजींच्या through जातो आहे का ? कदाचित नियतीलाच माहीत असेल.

धर्मग्रंथांना तरी सोडा; सेन्सॉर बोर्ड काय करतं? न्यायालयाने आदिपुरुषच्या निर्मात्यांसह सेन्सॉर बोर्डलाही फटकारलं

या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्याच्या आकलनाच्या पलीकडच्या आहेत. फक्त मला एवढेच माहित आहे किंवा मला जाणवतं आहे की स्मिता जी असामान्य आहेत Divine आहेत. तुम्ही नशीबवान असाल तर कदाचित तुमच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये त्या तुम्हाला कधीतरी भेटतील पण. स्मिता जयकर हे त्यांनी पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकाद्वारे कदाचित तुम्ही त्यांना ओळखायचा जाण्याचा प्रयत्न करू शकता. नक्की वाचा “मी स्मिता जयकर” हे पुस्तक अशी पोस्ट त्यांनी यावेळी केली आहे.

Exit mobile version