Download App

Kasara : स्मिता तांबेच्या ‘कासरा’ चित्रपटाचे पोस्टर आणि म्युझिक लाँच मोठ्या दिमाखात संपन्न

Smita Tambe New Kasara Movie: अभिनेत्री स्मिता तांबेनं (Smita Tambe) आजवर अनेक चित्रपटांतून आपल्या दमदार अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. आता ती आगामी “कासरा” (Kasara Movie) या शेतीप्रधान चित्रपटातून महत्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. (Marathi Movie) नुकतचं या मराठी सिनेमाचे धमाकेदार पोस्टर आणि म्युझिक लाँच मोठ्या दिमाखात संपन्न करण्यात आला आहे. (Social media) याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. येत्या 3 मे रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज करण्यात येणार आहे.

रवी नागपूरे यांच्या साई उत्सव फिल्म्सनं “कासरा” या मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे. विकास विलास मिसाळ यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केले असून त्यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. रवी नागपूरे यांच्याच या रंजक अशा कथेवर महेंद्र पाटील यांनी पटकथा आणि संवादलेखन तयार केलं आहे, तर अविनाश सातोसकर यांनी छायांकनाची धुरा सांभाळली आहे. प्रशांत नाकती यांनी लिहिलेल्या गीतांना प्रशांत नाकती, संकेत गुरव यांनी संगीत दिग्दर्शन केले असून ही गाणी गायक जावेद अली, आदर्श शिंदे गायिका आर्या आंबेकर, सोनाली सोनवणे, मनीष राजगिरे, रविंद्र खोमणे आणि रिषभ साठे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

या चित्रपटात अभिनेत्री स्मिता तांबे यांच्यासह अभिनेते गणेश यादव, प्रकाश धोत्रे, राम पवार, डॉ. वंदना पटेल, कुणाल सुमन, देवेंद्र लुटे, विशाल अर्जुन आणि बाल कलाकार साई नागपूरे यांच्या मध्यवर्ती भूमिका असून जनमेजय तेलंग, तन्वी सावंत हे हटके कलाकार या सिनेमातून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहेत. विष्णू खापरे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून आपली धुरा सांभाळली आहे.

थांबायचं नाय पोरी! मलंग, राझीनंतर अमृता खानविलकर दिसणार ‘या’ हिंदी वेब सीरिजमध्ये

स्मिता तांबेनं आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांतून सशक्त अभिनय केला आहे. त्याच पठडीत आता “कासरा” चित्रपटातही तिची महत्त्वाची भूमिका आहे. शेतीप्रधान विषयावरील “कासरा” हा चित्रपट अन्नदात्या शेतकऱ्याला अनोखा दृष्टिकोन देणारा आहे. शेतकऱ्यांसाठी शेतीतील प्रश्न मांडतानाच त्यावर उत्तर देण्याचाही आमचा हा छोटासा प्रयत्न हा चित्रपट करणार आहे. यामुळे स्मिता तांबेसारख्या दमदार अभिनेत्रीच्या अभिनयानं या सिनेमाचं कथानक वेगळ्या उंचीवर गेलं आहे. कासरा चित्रपट पाहण्यासाठी आता चाहत्यांना 3 मे पर्यंतच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

follow us

वेब स्टोरीज