Download App

Praveen Tarde: प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त बायकोने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाल्या…

Praveen Tarde Happy Birthday: दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे (Praveen Tarde Birthday) सध्या त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारखे त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडले. (Snehal Tarde) मराठी सिनेसृष्टीतल रांगडा गडी म्हणजे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे (Pravin Tarde). एका मागोमाग हिट चित्रपट देणारे प्रवीण तरडे (Praveen Tarde) हे नाव आज इंडस्ट्रीमध्ये मोठ्या आदराने घेतलं जातं.


आजवर त्यांच्या प्रत्येक सिनेमातून त्यांनी समाजाला संदेश देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दर्जेदार कलाकृतींसाठी ते नेहमीच चर्चेत असल्याचे बघायला मिळत असते. प्रवीण यांच्याप्रमाणे त्यांची पत्नी स्नेहल तरडे देखील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

स्नेहल मनोरंजनविश्वासह सोशल मीडियावर (social media) देखील कायम सक्रीय आहे. त्यामुळे कायम त्या नवीन पोस्ट शेअर करत असतात. आज प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांची पत्नी स्नेहल तरडे यांनी खास व्हिडीओ शेअर केल्याचे बघायला मिळाले आहे. जो सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आला आहे.

PM Narendra Modi Song: मोदींनी लिहिलेल्या गाण्याला ग्रॅमी पुरस्कारासाठी मिळालं नामांकन

अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या प्रवीण तरडेंसोबत पायऱ्यांवरुन बसून चांगल्या जोरदार गप्पा मारत असल्याचे दिसत आहेत. बॅकग्राऊंडला ‘यारियां २’ सिनेमातील ‘ऊंची ऊंची दीवारे’ हे गाणं लावण्यात आलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत स्नेहलने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ”वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रियवरा! धकाधकीच्या जीवनात, कामाच्या धबडग्यात प्रेमाचे असे गोड, निवांत क्षण तुला आयुष्यभर लाभोत या शुभ कामना!” स्नेहल तरडे यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील प्रवीण तरडेंवर मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

follow us