मुंबई: बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir khan) तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. आमिरने त्याची मैत्री गौरी स्प्रॅट ( Gauri spratt) हिच्याबरोबर रॅजिस्टर मॅरेज आहे. आमिर खानचे हे तिसरे लग्न आहे. पहिले लग्न त्याने रीना दत्ता हिच्याशी केले होते. तर दुसरे लग्न किरण राव हिच्याशी केले आहे. आमिरच्या तिसऱ्या लग्नाला त्याचे मुले, घटस्फोट झालेल्या दोन्ही पत्नीही हजर होत्या. या लग्नामुळे बॉलिवूड अभिनेते आणि त्यांचे लग्न पुन्हा चर्चेत आले आहेत. काही अभिनेते यांनी तर चार-चार लग्न केले आहेत. तीन आणि दोन लग्न करणाऱ्यांची यादीही मोठी आहे.
किशोर कुमार
गायक आणि अभिनेते किशोर कुमार यांचे खासगी आयुष्य वादळी राहिले आहेत. त्यांनी आयुष्यात चार विवाह केले होते. 1950 मध्ये त्यांनी रुमा गुहा ठाकुरता यांच्याशी पहिला विवाह केला. त्यानंतर त्यांचे मधुबाला यांच्यावर प्रेम जडले. त्यानंतर 1960 मध्ये दोघेही विवाह बंधनात अडकले. मात्र मधुबाला यांच्या निधनानंतर हा संसार संपुष्टात आला. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री योगिता बाली यांच्याशी विवाह केला. पण हे नाते केवळ फार काळ टिकले नाही. दोन वर्षामध्ये दोघेही विभक्त झाले. 1980 मध्ये त्यांनी अभिनेत्री लीना चंदावरकर यांच्याशी चौथा विवाह केला.
अभिनेते कबीर बेदी
अभिनेते कबीर बेदी यांनी आयुष्यात चार विवाह केले आहेत. कबीर बेदी यांनी 1969 मध्ये प्रतिमा बेदी यांच्याशी पहिला विवाह केला. त्यानंतर 1980 मध्ये सुसान हम्फ्रीज यांच्याशी दुसरा विवाह केला. 1992 मध्ये त्यांनी निक्की बेदी यांच्याशी तिसरा विवाह केला. मात्र, 2005 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी परवीन दोसांझ यांच्याशी विवाह केला असून, हे दोघे आजही एकत्र आहेत.
नीलिमा अजीम
अभिनेता शाहिद कपूर यांची आई नीलिमा अजीम यांनी तीन विवाह केले. त्यांचे पहिले पती अभिनेते पंकज कपूर होते. विभक्त झाल्यानंतर त्यांनी अभिनेते राजेश खट्टर यांच्याशी विवाह केला. या विवाहातून त्यांना एक मुलगाही आहे. मात्र, 2001 मध्ये हे नातेही संपले. त्यानंतर त्यांनी बालपणीचे मित्र उस्ताद रझा अली खान यांच्याशी विवाह केला. तोही विवाह टिकला नाही.
विनोद मेहरा
विनोद मेहरा यांचा पहिला विवाह मीना ब्रोका यांच्याशी ठरवून झाला होता. मात्र, हा संसार फार काळ टिकला नाही. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री बिंदिया गोस्वामी यांच्याशी विवाह केला. हे नातेही काही काळातच तुटले आणि बिंदिया यांनी नंतर दिग्दर्शक जेपी दत्ता यांच्याशी विवाह केला. विनोद मेहरा यांचे नाव अभिनेत्री रेखा यांच्याशी झालेल्या कथित विवाहामुळेही चर्चेत राहिले. 1988 मध्ये त्यांनी किरण यांच्याशी विवाह केला. मात्र, 1990 मध्ये त्यांच्या निधनामुळे हा संसार दोन वर्षांतच संपला.
संजय दत्त
‘खलनायक’ म्हणून ओळखले जाणारे संजय दत्त यांचे तीन लग्न झाले आहेत. त्यांनी सध्याच्या पत्नी मान्यता दत्त यांच्याशी 2008 मध्ये विवाह करण्यापूर्वी दोन विवाह केले होते. त्यांची पहिली पत्नी रिचा शर्मा यांचे ब्रेन ट्यूमरमुळे 1996 मध्ये निधन झाले. त्यानंतर 1998 मध्ये त्यांनी मॉडेल रिया पिल्लई यांच्याशी विवाह केला. मात्र, 2005 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
लकी अली
गायक-संगीतकार लकी अली यांनी तीन विवाह केले आहेत. त्यांची पहिली पत्नी मेघन जेन मॅक्लेरी होती, तर दुसरी पत्नी इनाया होती. 2010 मध्ये त्यांनी एका ब्रिटिश मॉडेलशी तिसरा विवाह केला.
सिद्धार्थ रॉय कपूर
सिद्धार्थ रॉय अभिनेते नाही. ते निर्माते आहेत. कपूर यांचा अभिनेत्री विद्या बालन यांच्याशी झालेला विवाह हा त्यांचा तिसरा विवाह होता. त्यांची पहिली पत्नी बालमैत्रीण होती. त्यानंतर त्यांनी एका दूरचित्रवाणी निर्मातीशी विवाह केला, मात्र 2011 मध्ये हे नातेही संपले.
विधू विनोद चोप्रा
चित्रपट निर्माता विधू विनोद चोप्रा यांनी प्रथम चित्रपट संपादक रेणू सलूजा यांच्याशी विवाह केला. त्यानंतर त्यांनी लघुपट निर्माते सुखदेव यांच्या कन्या शबनम सुखदेव यांच्याशी विवाह केला. पुढे त्यांची भेट लेखिका आणि चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांच्याशी झाली आणि त्यांनी त्यांच्याशी विवाह केला.
Bipasha Basu
करण सिंह ग्रोव्हर
मॉडेल आणि अभिनेता करण सिंह ग्रोव्हर याचाही अनेक विवाह केलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत समावेश होतो. करण सिंह ग्रोव्हर याने बिपाशा बसूबरोबर तिसरे लग्न केलेले आहे. करण आणि बिपाशा यांनी दहा वर्षांपूर्वी लग्न केलेले आहे. करणने 2008 मध्ये टीव्ही अभिनेत्री श्रद्धा निगम हिच्याशी लग्न केले होते. मात्र, अवघ्या दहा महिन्यांतच दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2012 मध्ये त्याने लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि दिल मिल गए मालिकेतील सहकलाकार जेनिफर विंगेट हिच्याशी विवाह केला. मात्र, हे नातेही फार काळ टिकले नाही आणि 2014 मध्ये दोघेही विभक्त झाले.
Kareena Kapoor
सैफ अली खान
बॉलिवूडचा ‘नवाब’ म्हणून ओळखला जाणारा सैफ अली खान याचेही दोन विवाह झालेले आहे. करिअर सुरू होण्यापूर्वीच ज्येष्ठ अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत त्यांचे प्रेमसंबंध जुळले. दोघांनी 1991 मध्ये विवाह केला. विशेष म्हणजे, सैफचा पहिला चित्रपट परंपरा 1993 मध्ये प्रदर्शित झाला, त्याआधीच त्यांचे लग्न झाले होते.मात्र, काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.यानंतर सैफ अली खानच्या आयुष्यात अभिनेत्री करीना कपूर आली. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सैफ आणि करीना यांनी 2012 मध्ये विवाह केला. त्यांना दोन तैमुर आणि जहांगीर असे दोन मुले आहेत.
राज बब्बर
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते राज बब्बर यांचे दोन विवाह झालेले आहेत. भारतीय सिनेसृष्टीत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या स्मिता पाटीलशी राज बब्बर यांनी दुसरे लग्न केले होते. राज बब्बरशी लग्न केलं तेव्हा ते घटस्फोटीत होती. राज बब्बरचं पहिले लग्न नादिराशी झाले होते. त्यांना दोन मुले होती. मुलगी जुही बब्बर आणि मुलगा आर्य बब्बर असे नाव आहेत. अनेक लग्न करण्याची यादी खूप मोठी आहे. कमल हसन यांचेही दोन विवाह झालेले आहे. बॉलिवूड अभिनेत्यांचे संसार हे प्रेमप्रकरणामुळेही मोडलेले आहेत.
