‘एक दिन’ची कथा ऐकून आमिर खान काय म्हणाले, जाणून घ्या त्यांचा खास अनुभव!

जुनैद खानच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना आमिर खान म्हणाले, “ही कथा एका अशा मुलाची आहे, जो खूप संकोची आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवत नाही.

Untitled Design (33)

What did Aamir Khan say? : आमिर खान प्रॉडक्शन्सची आगामी चित्रपट ‘एक दिन’ हळूहळू प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे. एक नाजूक, मनाला भिडणारी आणि जादुई प्रेमकथा म्हणून ओळखली जाणारी ही फिल्म तिच्या आकर्षक ट्रेलर आणि सुरेल गाण्यांमुळे आधीच लोकांच्या पसंतीस उतरली आहे. या चित्रपटात जुनैद खान एक अत्यंत लाजाळू मुलाचा रोल साकारत आहे, जो साई पल्लवी साकारत असलेल्या आत्मविश्वासू आणि मिसळखोर मुलीच्या प्रेमात पडतो. विशेष म्हणजे, आमिर खान यांना ही कथा त्यांच्या स्वतःच्या स्वभावाशीही जोडलेली वाटते.

जुनैद खानच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना आमिर खान म्हणाले, “ही कथा एका अशा मुलाची आहे, जो खूप संकोची आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवत नाही. तो विचार करतो की मी एखाद्या मुलीशी कसं बोलू? तुम्ही त्याला आत्मविश्वास कमी असलेला म्हणू शकता. माझ्याही आयुष्यात 16, 17, 18 वयाच्या काळात मी असाच होतो. खूप लाजाळू होतो आणि मला वाटायचं की मुली माझ्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे मला खात्री होती की मला आयुष्यात कोणी मिळणार नाही. ‘एक दिन’मधील नायकाचीही अशीच मानसिकता आहे. त्यालाही वाटतं की कोणतीही मुलगी त्याला पसंत करणार नाही. मी त्यासाठी योग्य नाही. जेव्हा मी ही कथा ऐकली, तेव्हा मला वाटलं ही तर माझीच कथा आहे.”

मुंबई-पुणे महामार्गावर मिसिंग लिंक खुली, आधी ब्रेक, आता एक्सेलेटर, मुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी

‘एक दिन’ या चित्रपटाद्वारे आमिर खान आणि मंसूर खान ही गाजलेली जोडी पुन्हा एकत्र आली आहे. याआधी त्यांनी ‘कयामत से कयामत तक’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘अकेले हम अकेले तुम’ आणि ‘जाने तू… या जाने ना’ सारखे गाजलेले चित्रपट दिले आहेत. आता या नव्या चित्रपटातून ते पुन्हा एकदा रोमँटिक शैलीत परतत आहेत, ज्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटात साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत आहेत. दिग्दर्शन सुनील पांडे यांनी केले असून निर्मिती आमिर खान, मंसूर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी केली आहे. हा चित्रपट आज, 1 मे 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

follow us