Dahaad Teaser Release: कल्पनेपलिकडच्या वास्तवाची गोष्ट, ‘दहाड’चा थरारक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Dahaad Teaser Release: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही तिच्या अभिनयाने चाहत्यांची नेहमीच मने जिंकत असते. सोनाक्षीने भाईजानच्या (Salman Khan) ‘दबंग’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या सिनेमामधील सोनाक्षीच्या अभिनयाचे अनेक चाहत्यांनी कौतुक केले आहे. आता सोनाक्षी ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे, तिची दहाड (Dahaad) ही सीरिज लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.   […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 26T151045.584

Dahaad Teaser Release

Dahaad Teaser Release: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही तिच्या अभिनयाने चाहत्यांची नेहमीच मने जिंकत असते. सोनाक्षीने भाईजानच्या (Salman Khan) ‘दबंग’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या सिनेमामधील सोनाक्षीच्या अभिनयाचे अनेक चाहत्यांनी कौतुक केले आहे. आता सोनाक्षी ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे, तिची दहाड (Dahaad) ही सीरिज लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.


या सीरिजचा टीझर रिलीज (Teaser Release) झाला आहे. प्राइम व्हिडिओ (Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मने त्यांच्या ‘दहाड’ या आगामी वेब सीरिजचा खतरनाक टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही सीरिज ८ एपिसोडची आहे. टीझरची सुरुवात २७ महिलांच्या खुनाच्या रहस्याने होते. या खुनांची ना कोणी तक्रार दाखल केली आहे, ना कोणी साक्षीदार आहे.

या टीझरमध्ये सोनाक्षी सिन्हा ही पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत चाहत्यांना दिसून येणार आहे. सोनाक्षीने या सीरिजमध्ये अंजली भाटिया ही भूमिका साकारली असल्याची दिसून आले आहे. अंजलीने २७ महिलांची मर्डर मिस्ट्री सोडवण्याचे मोठे टास्क हाती घेतले आहे, असे या टीझरमधून दिसत आहे. या टीझरमध्ये अभिनेता विजय वर्माची देखील छोटीशी झलक असल्याचे देखील दिसून आले आहे.


दहाड वेब सीरिजच्या टीझरला चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. या टीझरला अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने कमेंट केली आहे, ‘ही सीरिज रिलीज होण्याची मी उत्सुकतेने वाट पाहात होतो.’ जोया अख्तरने देखील दहाड वेब सीरिजचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोनाक्षी आणि विजय यांच्याबरोबरच या दहाड या सीरिजमध्ये गुलशन देवैया आणि सोहम शाह हे देखील प्रमुख भूमिका साकारणार असल्याचे दिसून येत आहे.

सुनील बर्वेच्या अमर फोटो स्टुडिओ नाटकानं घेतला अखेरचा निरोप

दहाड या सीरिजचा ट्रेलर ३ मे रोजी चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सोनाक्षीचा डबल एक्सएल हा सिनेमा काही दिवसाअगोदरच चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला चाहत्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता सोनाक्षीच्या दहाड या वेब सीरिजला चाहत्यांचा प्रतिसाद कसा मिळणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सोनाक्षीच्या आगामी सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात असतात. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.

Exit mobile version