Download App

MyLek Teaser: सोनाली खरेची लेकीसोबत ऑनस्कीन धमाल; ‘मायलेक’चा टीझर रिलीज

MyLek Teaser Release: आई मुलीचे नाते हे सर्वात जवळचे, खास असते. कधी त्या अतूट मैत्रिणी असतात, तर कधीकधी त्यांच्यात रुसवे फुगवेही खूप राहतात. त्यातही चांगलीच मजा असते. (Marathi Movie) याच गोड अशा अतूट नात्याची गोष्ट सांगणारा ‘मायलेक’ (MyLek Movie) चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या चित्रपटाच्या धमाकेदार टिझरची (MyLek Teaser) पहिली झलक रिलीज करण्यात आली आहे.

सोनाली खरे आणि सनाया आनंद यांच्यातील सुदृढ नाते या धमाकेदार टीझरमध्ये बघायला मिळत आहे. यात आईला जितके मुलीचे कौतुक आहे, तितकेच कौतुक, विश्वास मुलीलाही तिच्या आईबद्दल आहे. या मराठी चित्रपटात उमेश कामतही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत, प्रियांका तन्वर दिग्दर्शित ‘मायलेक’ चित्रपट येत्या 19 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून सोनाली खरे या चित्रपटाची निर्माती आहे. तर कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत.

‘रामायण’मध्ये रणबीरच्या ‘राम’ भूमिकेबद्दल अरुण गोविल थेटच म्हणाले, ‘तो संस्कारी मुलगा…’

दिग्दर्शिका प्रियांका तन्वरने सांगितलं आहे की, ”आई आणि लेकीचे नाते अधोरेखित करणारा हा मराठी सिनेमा आहे. यामध्ये धमाल, मजामस्ती, हसू आणि आसू, दुरावा अशा एखाद्या नात्यातील सर्वाना भावना आहेत. मुळात आई आणि मुलीचे नाते खूप नाजूक असते. या सिनेमाची खास गोष्ट म्हणजे यात खऱ्या मायलेकी असल्याने त्यांच्यातील नैसर्गिक केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर दाखवणे मला अधिकच सोप्पे झाल्याचे दिसत आहे. सोनाली एक उत्तम अभिनेत्री आहेच. तिचा हा गुण सनायामध्येही आला आहे. तिचा हा पहिला चित्रपट आहे, असे कुठेही जाणवत नाही. हा मराठी चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे, परंतु प्रत्येक ‘आई आणि लेकीने हा चित्रपट आवर्जून पाहावा.

follow us