मुंबई : मराठी भाषा दिनाला प्रत्येकजण सोशल मिडियातून भाषेबद्दलच प्रेम व्यक्त करीत असतो. अशाच प्रकारे गेल्यावर्षी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा द्यायला गेली आणि ट्रोल झाली होती. त्यानंतर तिने ती पोस्ट डिलिट केली होती पण यावर्षी देखील सोनाली कुलकर्णीचा (Sonali Kulkarni) जुन्या पोस्टने पिच्छा सोडला नाही. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) यांनी तिची जुनी पोस्ट शेअर करत ‘बामणी वृत्ती म्हंजे काय नेहमी विचारता ना? ही पहा!’ असे कॅप्शन देत तिच्यावर टीका केलीय.
काय म्हटली होती सोनाली कुलकर्णी?
सोनालीने मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देताना तिने म्हटले की, न आणि ण.. श आणि ष…ळ आणि ड, चांदणी मधील च आणि चंद्रामधील च, जहाजमधील ज आणि जीवनामधील ज यांच्या उच्चारातील फरक कळणाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! बाकीच्यांना मराठी भाशा दिणाच्या मणापासून षुभेच्छा!!!…
महाराष्ट्रात मराठी भाषा दिन असला की, अगदी सेलिब्रेटीपासून ते जनमाणसातील सगळ्यांना भाषेचं प्रचंड उधाण येते, त्यातही मराठी सेलिब्रेटी असले की ते उधाण अधिकच असते. पण सोनाली कुलकर्णीच्या त्या पोस्टने सोशल मिडियावर धुमाकुळ घातला होता. तिच्या पोस्टवर अनेकांनी काही सकारात्मक आणि नकारात्मक अशी मतं नोंदवली होती.
भुजबळ, राऊत, देशमुख यांच्यानंतर आता सिसोदिया, ईडीने अटक केलेले हे आहेत दिग्गज नेते
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे मराठी भाषेबद्दल म्हणतात…
‘शुद्ध असं काही नसतं. शुद्ध ही संकल्पनाच अत्यंत फालतू आहे. माझी भाषा ही माझी आहे. त्यामुळे शुद्ध, अशुद्ध असं काही नसतं. मुळात जगभरात कुठंही अशुद्ध भाषा हा प्रकारच नसतो. अमेरिकी भाषातज्ज्ञ नोम चॉम्स्की यांच्या शब्दांत सांगायचं तर भाषेचा हेतू हा शुद्ध ठरवणं, असा नसतो, तर संवाद साधणं असतो.’
‘लहानपणी मलाही माझ्या दिसण्यावरून न्यूनगंड होता. पण आता तो नाहीसा झाला आहे. सौंदर्य ही खूप मोठी गोष्ट आहे. सौंदर्याची व्याख्या खरं तर मला अलीकडंच कळू लागली आहे. गोरेपणा म्हणजे सौंदर्य नव्हे. साधी-साधी दिसणारी माणसंही मला सुंदर वाटतात. काहीच काम न करणाऱ्या हातांपेक्षा राबणारे हात मला सुंदर वाटतात’