झोया ज्वेल्स च्या व्हिस्पर्स फ्रॉम द वैली कलेक्शनमध्ये सोनम कपूर झळकली

Sonam Kapoor : टाटा ग्रुपच्या लक्झरी ब्रँड झोया(Zoya Jewels) ने काल हैदराबादमध्ये आपला प्रतिष्ठित व्हिस्पर्स फ्रॉम द वैली कलेक्शन

Sonam Kapoor

Sonam Kapoor

Sonam Kapoor : टाटा ग्रुपच्या लक्झरी ब्रँड झोया(Zoya Jewels) ने काल हैदराबादमध्ये आपला प्रतिष्ठित व्हिस्पर्स फ्रॉम द वैली कलेक्शन (Valley Collection) सादर केला. या कार्यक्रमाला ब्रँड म्बेसेडर आणि बॉलिवूड स्टार सोनम कपूर (Sonam Kapoor) यांच्यासोबत टायटन कंपनी लिमिटेडच्या ज्वेलरी डिव्हिजनचे सीईओ अजॉय चावला उपस्थित होते.

ग्लोबल फॅशन आयकॉन (Global Fashion Icon) सोनम कपूरने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी राहुल मिश्रा कूचरचा अप्रतिम गाऊन परिधान केला होता आणि झोयाच्या नव्या कलेक्शनमधील स्प्रिंग सांग चोकर आणि इयररिंग्स घालून आपला लूक अधिक उठावदार केला. बर्फातील शांतता आणि सफरचंदांच्या हिरवाईची झलक दाखवणारया ह्या दागिन्याने सोनमच्या ग्लॅमरस व्यक्तिमत्त्वाला अधिक खुलवत होते.

‘निशाणची’ चा ट्रेलर ठरला सुपरहिट; ऐश्वर्य ठाकरे आणि वेदिका पिंटो पोहोचले लालबागच्या राजाच्या चरणी!

Exit mobile version