Sonu Nigam Programme In Rajasthan CM Jaipur : आपल्या सुरेल आवाजाने लोकांची मने जिंकणाऱ्या सोनू निगमने (Sonu Nigam) अलीकडेच राजस्थानमध्ये आयोजित ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट 2024 मध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील अनेक नेते आणि मंत्री सहभागी झाले होते. पण सीएम साहेब (Rajasthan CM) आणि त्यांचे मंत्री शो मध्येच सोडून गेल्याने सोनू निगम संतापल्याचं समोर आलंय. सोनू निगमने या घटनेबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सोनू निगमची नाराजी जाहीरपणे स्पष्ट होतेय.
पॉवरहाऊस…प्रेक्षकांच्या भेटीला ; संजय दत्त एका अग्निमय अवतारात
राजस्थानची राजधानी जयपूर (Jaipur) येथे ‘रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट 2024’ चे आयोजन करण्यात आले होते. या समिटच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सोनू निगमनेही सादरीकरण केले. हॉटेल रामबाग पॅलेसमध्ये या लाईट अँड साऊंड शोचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा यांच्यासह अनेक नेतेही कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र व्यस्त वेळापत्रकामुळे सीएम शर्मा हे मध्येच कार्यक्रम सोडून निघून गेल्याचं सांगण्यात येतंय. हे पाहिल्यानंतर उपमुख्यमंत्री बैरवा आणि अनेक नेतेही हळूहळू निघू लागले. अशा स्थितीत व्हीआयपी गॅलरी रिकामी झाली. तरीही सोनूचे चाहते शोचा आनंद घेत होते.
सोनू निगमने जयपूरमध्ये आयोजित या कार्यक्रमाविषयी सांगितलं की, त्याने नुकताच ‘रायझिंग राजस्थान’ हा शो केला होता. ज्यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याचे क्रीडा आणि युवा कार्य मंत्री यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. पण ते शो मध्येच सोडून गेले होते. सोनू निगम या व्हिडिओमध्ये म्हणतोय की, ‘नमस्कार, मी नुकतेच जयपूरमधील एका कॉन्सर्टमधून येत आहे. ‘रायझिंग राजस्थान’ पूर्ण करून मी परत येत आहे. खूप चांगले लोक आले होते. तो एक मोठा शो होता. राजस्थानची शान वाढवण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. सीएम साहेब आणि राजस्थानातील अनेक प्रसिद्ध लोक सहभागी झाले होते. पण, मी पाहिलं की शोच्या मध्यभागीच सीएम साहेब आणि इतर अनेक बडे लोक उठून निघून गेले. ते निघून जाताच इतर प्रतिनिधीही निघून गेले. त्यामुळे देशातील राजकारण्यांना माझे आवाहन आहे की, तुम्ही तुमच्या कलाकारांचा आदर करत नसाल तर बाहेरचे लोक काय करणार?
सोनू इथेच थांबला नाही, तो पुढे म्हणाला- ‘मी असं कुठेही पाहिलं नाही. अमेरिकेत कोणी कार्यक्रम करत असेल आणि राष्ट्राध्यक्ष बसला असेल तर तो मधेच जातो, हे मी पाहिलेलं नाही. जर त्याला जायचे असेल तर तो कळवतो आणि जातो, म्हणून माझी विनंती आहे की तुम्हाला उठून जावेच लागणार असेल… तर शो सुरू होण्यापूर्वी तुम्ही येऊ नका किंवा निघू नका. एखाद्या कलाकाराचा शो मध्येच सोडून जाणे अत्यंत अनादरकारक तसेच देवी सरस्वती आणि कलेचा अपमान आहे. हे माझ्या लक्षात आले नाही, शो संपल्यानंतर मला काही मेसेज आले. ज्यात मला सांगण्यात आले होते की, असे शो करू नका. मला माहित आहे की तुम्ही सर्व व्यस्त आहात, खूप काम आहे, म्हणून कृपया आधीच निघून जा.
सोनू निगमच्या या पोस्टवर चाहते आणि इंडस्ट्रीतील इतर लोक कमेंट करत आहेत . हे सांगण्याची क्षमता तुमच्यातच आहे, असे लोक म्हणत आहेत. काही लोक अगदी बरोबर लिहून त्याच्या मुद्द्याचे समर्थन करत आहेत.