Sonu Nigam च्या ‘त्या’ घटनेवर फातर्पेकरांकडून पडदा! विश्वास न ठेवण्याचं आवाहन

Sonu Nigam च्या ‘त्या’ घटनेवर फातर्पेकरांकडून पडदा! विश्वास न ठेवण्याचं आवाहन

मुंबई : घडलेल्या प्रकाराबाबत आम्ही सोनू निगम आणि त्यांच्या त्यांच्या टीमची माफी मागितलीय, आता या विषयावर राजकारण करणाऱ्या कोणत्याही वृत्तांवर विश्वास ठेऊ नका, असं स्पष्टीकरण शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर यांची मुलगी सुप्रदा फातर्पेकर यांनी ट्विटद्वारे आवाहन केलंय.

काल रात्री फातर्पेकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सोनू सूद यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यानंतर या घटनेनंतर सुप्रदा फातर्पेकर यांनी स्पष्टीकरण दिलंय.

सुप्रदा यांनी ट्विटमध्ये म्हटलं, मोठ्या गर्दीमुळे त्या ठिकाणी गोंधळ माजला होता. त्यानंतर जो व्यक्ती खाली कोसळला, त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना आता रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलंय. सोनू निगम आता उत्तम आहेत.

जितना दबाओगे, उतना उचलके सामने आयेंगे, Ravindra Tupkar यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

आम्ही संस्थेकडून अधिकृतपणे काल घडलेल्या सर्व प्रकारची सोनू निगम आणि त्यांच्या टीमकडे माफी मागितली आहे. त्यामुळे कृपया या विषयावर राजकारण करणाऱ्या कोणत्याही वृत्तांवर विश्वास ठेऊ नका’, असं म्हणत आमदाराच्या लेकीने स्पष्टीकरण दिलं आहे.

Song Release : ‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी’तील पहिलं गाणं रिलीज

घटनेवर सोनू निगम म्हणाले..
माझा कॉन्सर्ट संपल्यानंतर मी स्टेजवरुन खाली निघालो होतो. दरम्यान स्वप्नील नावाच्या मुलाने मला पकडलं आणि सेल्फी घेण्याचा प्रयत्न करु लागला. मला त्याच नाव सर्व प्रकार झाल्यानंतर समजलं. या सेल्फी आणि व्हिडीओच्या जगात लोक काहीही समजून घ्यायला तयार नसतात.

त्या मुलाने जबरदस्ती सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताच हरिप्रकाश माझ्या मदतीसाठी पुढे आले. पण त्यांनाही त्याने धक्का दिला. त्यामुळे आम्ही दोघेही खाली पडलो. तेच व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Maharashtra Politics :’उद्धव ठाकरेंनी धमकीच दिली’; भगतसिंह कोश्यारींच्या दाव्यावर फडणवीस स्पष्टच बोलले

त्यावेळी आम्हाला वाचवायला रब्बानी पुढे सरसावले. रब्बानीनासुद्धा त्याने धक्का दिला. सुदैवाने ते वाचले. कारण मागे काही अवजड वस्तू असती तर त्यांचं डोकं त्यावर आपटलं असतं. कदाचित मृत्यूही झाला असता. सोनू निगमच्या टीममधील दोघा जखमींना रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे.

Kasba Bypoll : अजित पवारांचा ‘रोड’शो… भाजपकडून उदयनराजेंचे उत्तर!

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या प्रकरणी सोनू निगमने चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आता या विषयावर राजकारण करणाऱ्या कोणत्याही वृत्तांवर विश्वास ठेऊ नका’ असं आवाहन सुप्रदा फार्तेकर यांनी केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube