Song Release : ‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी’तील पहिलं गाणं रिलीज
मुंबई :‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता सुबोध भावे हा मुख्य भूमिकेत असून अभिनेत्री कोण असणार याची उत्सुकता संपली आहे. कारण प्रियदर्शनी इंदलकर ही फुलराणीची भूमिका साकारणार आहे.
त्यानंतर आता या चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. हिरवे-हिरवे असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं मूळ बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी मूळ नाटक फुलराणीसाठी लिहिले आहे. त्याला आता निलेश मोहरीर यांनी संगीत दिलं आहे. तर हे गाणं गायिका वैशाली सामंत यांनी गायलं आहे.
‘ही’ अभिनेत्री अवतरणार ‘फुलराणी’ च्या रूपात…
‘पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाट्यकृतीवर 1964 साली आलेली ‘माय फेअर लेडी’ ही म्युझिकल फिल्म चांगलीच गाजली होती. याच कलाकृतीने प्रेरित होऊन विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. ‘फिनक्राफ्ट मिडिया’ ‘अमृता फिल्म्स’ आणि ‘थर्ड एस एंटरटेन्मेंट’ ने चित्रपटाची प्रस्तुती केली असून विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.
जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. गीते बालकवी व गुरु ठाकूर यांची असून संगीत निलेश मोहरीर यांचे आहे. छायांकन केदार गायकवाड, कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. 22 मार्चला गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘फुलराणी’ चित्रपटाचे वितरण वायकॉम 18 स्टुडिओ करणार आहे.