Sonu Sood च्या ‘फतेह’ चा बहुप्रतिक्षित टीझर प्रदर्शित; चाहत्यांची उत्कंठा वाढली

Sonu Sood : अभिनेता सोनू सूदने ( Sonu Sood ) त्याच्या डेब्यू प्रोडक्शन ‘फतेह’ साठी (Fateh Movie) चित्रीकरण पूर्ण केल असून त्याच्या चाहत्यांना त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या पडद्यामागील एक खास झलक बघायला मिळाली. ‘फतेह’ चा बहुप्रतिक्षित टीझर प्रदर्शित झाला असून त्याच्या चाहत्यांना त्याच्या चित्रपटाकडून आता खूप अपेक्षा आहेत. ठाकरेंना धक्का! आणखी एका आमदाराचा जय महाराष्ट्र; आजच […]

Kuwait Fire दुर्घटनाग्रस्तांसाठी सोनू सूदचं आवाहन; सरकारला केली मदतीचा मागणी

Sonu Sood

Sonu Sood : अभिनेता सोनू सूदने ( Sonu Sood ) त्याच्या डेब्यू प्रोडक्शन ‘फतेह’ साठी (Fateh Movie) चित्रीकरण पूर्ण केल असून त्याच्या चाहत्यांना त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या पडद्यामागील एक खास झलक बघायला मिळाली. ‘फतेह’ चा बहुप्रतिक्षित टीझर प्रदर्शित झाला असून त्याच्या चाहत्यांना त्याच्या चित्रपटाकडून आता खूप अपेक्षा आहेत.

ठाकरेंना धक्का! आणखी एका आमदाराचा जय महाराष्ट्र; आजच करणार शिंदे गटात प्रवेश

या टीझरमध्ये सायबर गुन्ह्यांच्या एका रोमांचकारी जगाची झलक दाखवण्यात आली आहे. जो एक रोमांचक सिनेमॅटिक देऊन जाणार आहे. चित्रपटाची टॅगलाईन ‘नेव्हर अंडरएस्टीमेट अ नोबडी’ ही सर्वात वेगळी गोष्ट आहे जी सोनू च्या वैयक्तिक प्रवासालाही खऱ्या अर्थाने लागू होते. फतेह चा त्याने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

फतेह सारख्या या ॲक्शन सिनेमात जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहे आणि सोनू सूदच दिग्दर्शनात पदार्पण आहे. यापूर्वी, सोनू सूदने या चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला होता, ज्याला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले होते. टीझरने चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे.

अशोक चव्हाणांनी अचानक घेतली जरांगेंची भेट; दोघांत दीड तास चर्चा, कारण काय?

‘फतेह’मध्ये सोनूने अभिनेता-दिग्दर्शक-लेखक-निर्माता अशी चौपट भूमिका साकारली आहे. या चित्रपटात भारतीय आणि हॉलीवूड क्रूचे उत्कृष्ट मिश्रण आहे आणि यापूर्वी कधीही न पाहिलेले ॲक्शन सीक्वेन्स यात बघायला मिळणार आहेत. सोनाली सूद/शक्ती सागर प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज निर्मित, हा चित्रपट सायबर क्राइमच्या गुंतागुंत आणि आव्हानांभोवती फिरतो.

Exit mobile version