अशोक चव्हाणांनी अचानक घेतली जरांगेंची भेट; दोघांत दीड तास चर्चा, कारण काय?
Ashok Chavan meets Manoj Jarange : काँग्रेस सोडून नुकतेच भाजपात दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी अचानक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची (Manoj jarange) भेट घेतली. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गेवराईचा दौरा आटोपल्यानंतर चव्हाण जरांगे पाटलांच्या गावी आंतरवाली सराटीत दाखल झाले. यावेळी चव्हाण यांनी त्यांच्या वाहनांचा ताफा पंधरा किलोमीटर दूर ठेवला होता. या दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघांत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही.
State Assembly Election 2024 : लोकसभेपाठोपाठ ‘त्या’ चार राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर, मतदान कधी?
अशोक चव्हाण आधी काँग्रेसमध्ये होते. मात्र निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. राज्यसभेची खाासदारकीही मिळवली. याच अशोक चव्हाणांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळांत चर्चांना उधाण आले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 900 एकर परिसरात जाहीर सभा घेणार असल्याचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर राजकीय नेत्यांना त्यांची भेट घेण्याची वेळ का आली, असा सवाल आता विचारला जात आहे.
अशोक चव्हाण यांनी नेमक्या कोणत्या कारणासाठी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. शासनाचा प्रतिनिधी म्हणून नाही तर समाज म्हणून जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन काळातही त्यांची भेट घेतली होती. मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेतही मी काम केलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फक्त चर्चेतूनच मार्ग काढण्याची गरज आहे.
सगेसोयऱ्याच्या अध्यादेशावर आता हरकती आल्या आहेत. आता निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे या प्रक्रियेला आता किती वेळ लागेल हे आज तरी सांगता येणार नाही. मराठा समाजाचा प्रश्न समन्वयातून सुटावा यासाठी आपण प्रयत्न करत राहणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
अशोक चव्हाण भाजपमध्ये..काँग्रेस अन् अमित देशमुखांच्या डोक्यात काय सुरु आहे?