Ashok Chavhan एकनाथ शिंदेंसोबतच पक्ष सोडणार होते, राऊतांचा गौप्यस्फोट

  • Written By: Last Updated:
Ashok Chavhan एकनाथ शिंदेंसोबतच पक्ष सोडणार होते, राऊतांचा गौप्यस्फोट

Ashok Chavhan : राज्यात लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी काल पक्षाला सोडचिठ्ठी दिली. हा राजकीय भूकंप झाल्याने आघाडी बॅकफूटवर ढकलली गेली आहे. मात्र अशोक चव्हाण हे 2 वर्षांपूर्वी म्हणजे एकनाथ शिंदेंसोबतच पक्ष सोडणार होते. असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.

तिसऱ्या आठवड्यातच ‘फायटर’ची बॉक्स ऑफिसवर हालत खराब, अ‍ॅक्शन रसिकांच्या अपेक्षा धुळीस

यावर बोलताा संजय राऊत म्हणाले की, चोऱ्या माऱ्या करणे, भ्रष्टाचाऱ्यांचा सत्कार करणं, खुनी दरोडेखोरांना पक्षांमध्ये घेणे. याला जर भाजपवाले स्ट्रॅटेजी समजत असतील. तर हा चाणक्य आणि विदुर यांचा अपमान आहे. तसेच अशोक चव्हाण हे दोन वर्षांपूर्वीच पक्ष सोडणार होते. एकनाथ शिंदे सोबतच त्यांची काँग्रेस पक्ष सोडण्याची योजना होती. आता फक्त त्यांना जाण्याचा मुहूर्त मिळाला
आहे.

Pakistan Elections : आश्चर्यच! जिंकलेल्या उमेदवारांनीच घेतली माघार; पाकिस्तानात चाललंय तरी काय?

मात्र अशोक चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध होता. ते अत्यंत हुशार राजकारणी आणि चांगले प्रशासक होते. हे मान्य करायला हवे. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर त्यांची पकड होती. पण त्यांनी हा घेतलेला निर्णय काँग्रेस पक्षासाठी नाही. तर त्यांच्या राजकीय भविष्यासाठी धोक्याचा ठरणार आहे.

अशोक चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांची काल फोनवरून चर्चा झाली. त्यावेळी ठाकरे यांनी चव्हाणांचा हा निर्णय चुकीचा असल्याचं त्यांना सांगितलं. तसेच भाजपने आमचे कितीही नेते फोडले. तरी देखील लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या भाजप पेक्षा 10 जागा जास्त असतील. असा विश्वास यावेळी राऊत त्यांनी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज