Pakistan Elections : आश्चर्यच! जिंकलेल्या उमेदवारांनीच घेतली माघार; पाकिस्तानात चाललंय तरी काय?

Pakistan Elections : आश्चर्यच! जिंकलेल्या उमेदवारांनीच घेतली माघार; पाकिस्तानात चाललंय तरी काय?

Pakistan Elections 2024 : पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत यंदा बराच गोंधळ (Pakistan Elections 2024) उडाला. या निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केल्याने येथील राजकारण तापले आहे. या प्रकाराचा विरोध म्हणून दोन राजकीय पक्षांनी सिंध विधानसभेतील तीन जिंकलेल्या जागा सोडण्याची घोषणा केली आहे. निवडणुकीत फसवणूक होत असल्याचे विरोधी पक्षांचे आरोप निवडणूक आयोगाने मात्र फेटाळून लावले आहेत.

ग्रँड डेमोक्रॅटिक अलायन्सचे प्रमुख शाह रशीदी यांनी कराचीत पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली. सिंध विधानसभेत पक्षाने जिंकलेल्या दोन जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पाकिस्तान जमात ए इस्लामी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सिंध विधानसभेतील जिंकलेली एक जागा सोडणार असल्याचे सांगितले. या मतदारसंघात गुरुवारी मतदान झाले होते.

Pakistan Elections : बहुमतापासून सगळेच दूर पण, इम्रान समर्थकांची मुसंडी; पाकिस्तानात सरकार कुणाचं?

कराची सेंट्रल मतदारसंघात खरंतर इम्रान खान (Imran Khan) यांच्या पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पक्ष समर्थित अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला होता. निवडणूक आयोगाने मात्र दुसऱ्याच उमेदवाराला विजयी घोषित केले. विशेष म्हणजे, जिंकलेल्या उमेदवारानेच आयोगाच्या या अनागोंदी कारभाराची पोलखोल केली. या मतदारसंघात हाफिज नईमुर रहमान यांनी 26 हजार 296 मते घेत वियय मिळवल्याचे निवडणूक आयोगाने घोषित केले होते.

पीटीआय समर्थित अपक्ष उमेदवार सैफ बारी यांनी विजय मिळवला आहे. त्यांची मते 31 हजारांवरून 11 हजार करण्यात आली. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की पक्षाच्या नैतिकतेच्या परंपरेचा विचार करून मी विधानसभेतील माझी जागा रिक्त करत आहे.

निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप करत सिंध प्रांतात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांकडून निदर्शने केली जात आहेत. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही मिळाले. 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीनंतर पीटीआय, जमात ए इस्लामीसह अन्य काही पक्ष दावा करत आहेत की त्यांच्या उमेदवारांना जाणूनबुजून पराभूत करण्यात आले. त्यामुळे निकाल कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही.

Pakistan Elections : दहशतवादी हाफिज सईदच्या मुलाचा निवडणुकीत पराभव; फक्त ‘इतकी’ मते मिळाली

दरम्यान, काल मतमोजणीआधीच गोंधळाला सुरुवात झाली होती. मतमोजणी बराच काळ बंद होती. त्यामुळे निकालाची माहिती प्रसारमाध्यमांना मिळत नव्हती. इम्रान खान यांनीही निकालाचे अपडेट त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून दिले नव्हते. या गोंधळात दोन तास निघून गेले. त्यानंतर आयोगाने निकाल देण्यास सुरुवात केली. इंटरनेट बंद करण्यात आले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज