Pakistan Elections : पाकिस्तानात पुन्हा मतदान! ‘या’ मतदान केंद्रांवर फेर मतदानाची आयोगाची घोषणा

Pakistan Elections : पाकिस्तानात पुन्हा मतदान! ‘या’ मतदान केंद्रांवर फेर मतदानाची आयोगाची घोषणा

Pakistan Elections 2024 : पाकिस्तानात मतमोजणी अजूनही संपलेली नाही. दोन दिवसांपासून (Pakistan Elections 2024) मतमोजणी सुरू असून अंतिम निकाल आलेला नाही. वारंवार इंटरनेट बंद पडणे, मतमोजणीतील संथपणा, दहशतवादी हल्ले या काही कारणांमुळे निकाल येण्यास उशीर होत आहे. सध्याच्या परिस्थितीत माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांचे समर्थित उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तान निवडणूक आयोगाने काही मतदान केंद्रांवर फेर मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. काही मतदान केंद्रांवर हिंसा झाली होती तर काही ठिकाणी उमेदवार आणि मतदारांकडून असे सांगण्यात आले होते की काही लोकांनी मतदान साहित्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनांची दखल घेत आयोगाने अशा ठिकाणी पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले.

मतमोजणी सुरू असतानाच या मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे आदेश दिले गेले आहेत. जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाने या मतदान केंद्रांवर 15 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. एनए-88 खुशाब (पंजाब), पीएस-18 घोटकी (सिंध), पीके-90 कोहाट (खैबर पख्तुनख्वा) या मतदान केंद्रांवर फेर मतदान होणार आहे.

Pakistan Elections : बहुमतापासून सगळेच दूर पण, इम्रान समर्थकांची मुसंडी; पाकिस्तानात सरकार कुणाचं?

पाकिस्तानातील अंतिम निवडणुकांचे निकाल अजूनही आलेले नाहीत. यामुळे सगळेच हैराण झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या कारभारावरच आता राजकीय पक्ष संशय व्यक्त करू लागले आहेत. या निवडणुकीत नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे असा आरोप होऊ लागला आहे. सध्याच्या परिस्थितीत माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे समर्थित उमेदवार 99 जागांवर आघाडी घेऊन आहेत. सर्वाधिक जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत.

पाकिस्तानच्या विधानसभा निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाला पंजाब प्रांतात 116, सिंधमध्ये 12, बलुचिस्तानात 0 आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात 79 जागा मिळताना दिसत आहेत. पाकिस्तान पीपुल्स पार्टीला पंजाब प्रांतात 10, सिंधमध्ये 82, बलुचिस्तानात 9 आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात 4 जागा मिळतील असे दिसत आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग-एन पक्षाला पंजाबमध्ये 134, बलुचिस्तान 9 आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात 5 जागा मिळण्याची शक्यता आहे.

PM मोदी अचानक पाकिस्तानला कसे गेले होते? नऊ वर्षांनंतर खासदारांना स्वतःच रंगवून सांगितला किस्सा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज