तिसऱ्या आठवड्यातच ‘फायटर’ची बॉक्स ऑफिसवर हालत खराब, अ‍ॅक्शन रसिकांच्या अपेक्षा धुळीस

तिसऱ्या आठवड्यातच ‘फायटर’ची बॉक्स ऑफिसवर हालत खराब, अ‍ॅक्शन रसिकांच्या अपेक्षा धुळीस

Fighter Box Office Collection Day 19: हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर चित्रपट ‘फाइटर’ (Fighter Movie) प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या चार दिवसात या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत चढ-उतार होत राहिले. मात्र, तिसऱ्या वीकेंडला चित्रपटाने पुन्हा एकदा वेग पकडला आणि चांगले कलेक्शन केले. ‘फायटर’ने रिलीजच्या तिसऱ्या सोमवारी किती गल्ला कमावला आहे चला तर मग पाहूया…

रिलीजच्या 19 व्या दिवशी ‘फायटर’ने किती कमाई केली? ‘पठाण’ फेम दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या (Siddharth Anand) दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘फायटर’ला प्रेक्षक आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. देशभक्तीने भरलेला हा एरियल ॲक्शन थ्रिलर प्रेक्षकांच्या हृदयाला भिडला. या चित्रपटात पहिल्यांदाच हृतिक आणि दीपिका यांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांनाही आवडली. मात्र, कमाईच्या बाबतीत चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. आता या चित्रपटालाही शाहिद आणि क्रितीच्या ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ (Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya) या चित्रपटाशी स्पर्धा करायची आहे. अशा परिस्थितीत ‘फायटर’ फार उंच टोकाला पाहचू शकत नाहीय.

चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर ‘फाइटर’ने 22.5 कोटी रुपयांचे खाते उघडले आहे. यानंतर, चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 146.5 कोटी रुपयांची कमाई केली आणि दुसऱ्या आठवड्यात 41 कोटी रुपयांची कमाई केली. आता हा चित्रपट रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यात आहे. तिसऱ्या शनिवारी या चित्रपटाने 3.65 कोटींची कमाई केली होती, तर तिसऱ्या रविवारी ‘फायटर’चे कलेक्शन 4 कोटी रुपये होते. आता तिसऱ्या सोमवारच्या म्हणजेच चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 19व्या दिवसाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे आले आहेत.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ”फायटर”ने तिसऱ्या सोमवारी म्हणजेच रिलीजच्या 19व्या दिवशी फक्त 1.20 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 19 दिवसांचे ‘फायटर’चे एकूण कलेक्शन आता 198.10 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

श्रेयस तळपदे- गौरी इंगवलेची जुळणार ‘ही अनोखी गाठ’? व्हॅलेंटाईन वीकमध्ये ट्रेलर प्रदर्शित

‘फायटर’ने जगभरात किती जमा केले? ‘फायटर’च्या क्रेझने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले आहे. यासोबतच या चित्रपटाने जगभरात उत्तम कलेक्शन केले आहे. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता अनिल कपूरने त्याच्या X खात्यावर म्हणजेच ट्विटरवर ‘फायटर’च्या जगभरातील कमाईचे आकडे शेअर केले आहेत. त्यानुसार ‘फायटर’ने जगभरात 337 कोटी रुपये कमावले असून आता हा चित्रपट 340 कोटींचा आकडा पार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

काय आहे ‘फायटर’ची कथा? ‘फायटर’ स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानिया (हृतिक रोशन), स्क्वॉड्रन लीडर मीनल राठोड (दीपिका पदुकोण) आणि ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंग (अनिल कपूर) आणि आयएएफ युनिट, एअर ड्रॅगन्सच्या इतर सदस्यांभोवती फिरते. एरियल ॲक्शन चित्रपटात करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय यांच्याही भूमिका आहेत. हे भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्य, बलिदान आणि देशभक्तीला श्रद्धांजली म्हणून सादर केले गेले आहे. या चित्रपटाची निर्मिती Viacom18 Studios ने Marflix Pictures च्या सहकार्याने केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज