Download App

Odisha Train Accident: जनसामान्यांचा हिरो पुन्हा मदतीला धावून आला..सोनू सूदची अपघातग्रस्तासाठी नवी मोहीम!

Sonu Sood: ओडिशा रेल्वे अपघातामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. (Odisha Train Accident) या घटनेमध्ये २०० पेक्षा जास्त रेल्वे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर जवळपास ९०० लोक जखमी झाले आहेत. परंतु आता बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूदने या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्णय हाती घेतला आहे. सोशल मीडियावर (Social media) एका पोस्टद्वारे त्याने ही माहिती दिली आहे.


सोनू सूदने इन्स्टाग्राम हँडलवर स्वत:चा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो म्हणत आहे की, ‘मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की, ओडिशा ट्रेन दुर्घटनेमुळे कोणत्या कुटुंब सर्वाधिक प्रभावित झाली आहेत. काही लोकांनी त्यांचे नातेवाईक गमावले आहेत, तर काही लोक गंभीर जखमी झाले आणि ते आता त्यांचे जीवन कसे जगतील हे माहित नाही.

तसेच सोनू सूद पुढे म्हणाला आहे की, ‘त्या लोकांना मदत करण्यासाठी आम्ही एक हेल्पलाइन नंबर ९९६७५६७५२० जारी केला आहे. जो मी आपल्याला शेअर करत आहे. तुम्ही आम्हाला या क्रमांकावर पीडितांच्या कुटुंबाशी जोडू शकणार आहात, त्यामुळे कृपया यावर मेसेज पाठवा. लक्षात ठेवा, तुम्हाला या नंबरवर कॉल करण्याची गरज नाही. फक्त एसएमएस पाठवा. तुम्ही आम्हाला त्या कुटुंबामध्ये सहभागी करून घ्या. त्यांना पुन्हा त्यांच्या पायावर कसे उभे करायचे याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

पीडित कुटुंबाला नोकरी, व्यवसाय, मुलांच्या शिक्षणाविषयी अशा सर्वतोपरी मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस पश्चिम बंगालच्या हावडा रेल्वे स्थानकापासून तमिळनाडूच्या चेन्नईपर्यंत धावते. अपघातात या एक्स्प्रेसचे १५ डबे रुळावरुन घसरले. यामध्ये ७ डबे पूर्णपणे उलतून पडले आहे. सिग्नलमध्ये झालेल्या गोंधळामुळे अपघात झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

‘मैं अटल हूँ’ सिनेमाचे शूटिंग सुरु, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता असणार मुख्य भूमिकेत

कोरोमंडल एक्स्प्रेसच्या चालकाने हिरवा सिग्नल बघितला होता. यामुळे त्यानं एक्स्प्रेस पुढे नेली होती. एक्स्प्रेसचा वेग १३० किमी प्रतितास होता. या वेगातच एक्स्प्रेस मालगाडीला जोरदार धडकली. यामुळे एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले आणि शेजारच्या रुळांवर जाऊन पडले. तितक्यातच  त्या रुळांवरुन शालिमार एक्स्प्रेस धावली. तिनं कोरोमंडलच्या डब्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये शालिमारचे देखील डबे रुळांवरुन घसरले आहेत.

Tags

follow us