Sonu Sood: चाहत्याने मानले आभार! पुन्हा सोनू सूद देवासारखा धावून आला..

Sonu Sood: कोरोना काळात गरिबांसाठी देवासारखा धावून आलेला सोनू अद्याप मदत कार्यात गुंतला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सोनू लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहे. कधी तो कोणाला उपचारांसाठी मदत करताना दिसतो (Social media) तर कधी मुलांच्या शिक्षणामध्येही मोलाचा वाटा उचलत असतो. गेल्या काही दिवसाखाली त्याने एका तरुणाला पायलट (pilot)बनण्यास मदत केली होती, आणि आता त्याच […]

Sonu Sood ही झाला डीपफेकचा शिकार; तोतयाकडून पैशांची गरज असलेल्या कुटुंबाला फसवण्याचा प्रयत्न

Sonu Sood

Sonu Sood: कोरोना काळात गरिबांसाठी देवासारखा धावून आलेला सोनू अद्याप मदत कार्यात गुंतला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सोनू लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहे. कधी तो कोणाला उपचारांसाठी मदत करताना दिसतो (Social media) तर कधी मुलांच्या शिक्षणामध्येही मोलाचा वाटा उचलत असतो. गेल्या काही दिवसाखाली त्याने एका तरुणाला पायलट (pilot)बनण्यास मदत केली होती, आणि आता त्याच स्वप्न सत्यात उतल्यावर त्या चाहत्याने अखेर त्याचे आभार मानले आहे.


गरीबीत जन्मलेल्या या व्यक्तीने अनेक संकटांना तोंड दिले आणि अशा पार्श्वभूमीतून उदयास आला जिथे पायलट बनण्याची स्वप्न अशक्य वाटत होती. त्याने यावेळी सांगितले आहे की, मला खूप संघर्षांचा सामना करावा लागला, पुरेसे आर्थिक पाठबळही नव्हतं. एअरलाइनमध्ये मदतनीस आणि क्लिनर म्हणून छोटासा प्रवास सुरू केल्यानंतर, त्याला एक अनपेक्षित सहकारी मिळाला आणि तो म्हणजे अभिनेता सोनू सूद. “सोनू सूदने मला मदत केली आणि सोनू सूदच्या प्रेरणेने फाऊंडेशनकडून विनंती केल्यानंतर मला लगेच आर्थिक मदत मिळाली होती.

यामुळे सोनूचे आभार मानण्यासाठी हा एक खास व्हिडिओ बनवला. फतेहची तयारी करत असलेल्या अभिनेत्याने वामसीचा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. “वैमानिक बनणे हे एक स्वप्न होते जे वामसीच्या हृदयात होत आणि स्वप्नपूर्ती झाली. आम्ही त्याचे मार्गदर्शक त्याचा आव्हानांना सामोरं जात अतुलनीय पाठिंब्याने वामसीने त्याच स्वप्न पूर्ण केलं आहे.

A R Rahmanच्या असोसिएशनला धाडली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची नोटीस

यावर वामसीने देखील प्रतिक्रिया दिली आहे लोकांनी माझ्यासारखे वैमानिक व्हायचे आहे, असे सांगून माझ्यापर्यंत पोहोचले आहे. हा विश्वास, कमी विशेषाधिकार असलेले देखील पायलट होऊ शकतात. असंख्य लोकांच्या मनात घर केले आहे, सर्व धन्यवाद सोनू सूदला. या पायलटची कहाणी आशेचा किरण आहे. सोनू ने आजवर अनेकांना मदत करून त्यांच्या जीवनात एक अनोखा बदल घडवून आणला आहे.

Exit mobile version