Download App

Sonu Sood: अभिनेत्याने अनोखा फोटो शेअर केला अन् म्हणाला, ‘यासाठी खूप…’

Sonu Sood: सोनू सूद हा बॉलिवूडमधील (Bollywood) लोकप्रिय अभिनेता. सोनू सूद (Sonu Sood) अनेकदा त्याच्या विविध वक्तव्याने चर्चेत असतो.

Sonu Sood: सोनू सूद हा बॉलिवूडमधील (Bollywood) लोकप्रिय अभिनेता. सोनू सूद (Sonu Sood) अनेकदा त्याच्या विविध वक्तव्याने चर्चेत असतो. सोनू गरीब लोकांना मदत करण्यात पुढे असतो. लॉकडाऊनच्या काळात सोनूने केलेली मदत सर्वांना माहितच आहे. सोनूला ‘गरीबांचा मसीहा’ असंही म्हणतात. नुकतंच सोनू सूदची एक अनोखी प्रतिमा इंटरनेटवर व्हायरल होत असताना अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर फोटो शेअर केले आहे.


फोटो शेअर करत असताना त्यावर अभिनेता सोनू सूदने लिहिले आहे की, खूप नम्र आणि कृतज्ञ” या फोटोला सोनू सूदच्या चाहत्यांकडूनही खूप प्रतिक्रिया मिळत आहेत. सोनू सूद सध्या त्याच्या आगामी ॲक्शनर ‘फतेह’ च्या रिलीजच्या तयारीत आहे. जो यावर्षी रिलीज होणार आहे. सूदच्या म्हणण्यानुसार, ‘फतेह’ हा हॉलिवूड-अभिनेत्यांच्या बरोबरीने आहे आणि भारतीय ॲक्शन चित्रपटांना एक दर्जा देण्याचे वचन देतो.

चित्रपटाचे चित्रीकरण जगभरातील आकर्षक ठिकाणी करण्यात आले आहे आणि पूर्ण होण्यासाठी तीन वर्षे लागली आहेत. सोनू सूद यांच्या दिग्दर्शनात पदार्पण आहे. सोनू सूदशिवाय या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, ज्यांनी ‘फतेह’ पाहिला आहे, त्यांना तो आवडला आहे.

Jackie Shroff : जॅकी श्रॉफ यांची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका, ‘माझ्या प्रतिमेचा आणि…’

सूदने असेही व्यक्त केले की मला दिग्दर्शनाच्या अधिक ऑफर्स येत आहेत. ‘फतेह’ रिलीज झाल्यानंतर तो दिग्दर्शक म्हणून दुसरा प्रोजेक्ट हाती घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. लवकरच पुढील प्रोजेक्टची स्क्रिप्ट लिहिण्यास सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

follow us

वेब स्टोरीज