Actor Darshan arrested : प्रसिद्ध अभिनेता दर्शन (Actor Darshan) याला रेणुकास्वामी हत्याकांड (Renukaswamy Murder Case) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जामीन रद्द केल्यानंतर १४ ऑगस्ट २०२५ रोजी अटक केली आहे. या प्रकरणाने कर्नाटकात खळबळ उडवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाचा (Karnataka High Court) जामीन मंजूर करण्याचा निर्णय रद्द करताना कठोर टिप्पणी केली आणि दर्शनला तात्काळ अटकेचे आदेश दिले होते.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ऑपरेशन सिंदूरमधील 9 अधिकाऱ्यांना मिळणार वीरचक्र
रेणुकास्वामी (वय ३३) हा दर्शनचा चाहता होता, परंतु त्याने दर्शनच्या मैत्रिणी आणि सह-अभिनेत्री पवित्रा गौडा यांना अश्लील संदेश पाठवल्याचा आरोप होता. यामुळे संतापलेल्या दर्शनने कथितरित्या आपल्या चाहत्यांना रेणुकास्वामीचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यास सांगितल होते. जून २०२४ मध्ये चित्रदुर्ग येथून रेणुकास्वामीचे अपहरण झाले आणि बेंगळुरूतील एका शेडमध्ये त्याला क्रूरपणे मारहाण करण्यात आली. यात विद्युत उपकरणांनी त्याच्या गुप्तांगांना झटके देण्यात आले होते. या अमानुष छळात त्याच्या छातीचे हाड तुटले आणि डोक्यावरही गंभीर जखमा झाल्या होत्या. त्याच्या शरीरावर ३९ जखमांच्या खुणा आढळल्या होत्या आणि अखेर त्याचा मृत्यू झाला होता.
इम्तियाज जलील यांच्या घरी उद्या चिकण, मटन पार्टी, CM फडणवीसांना अन् सर्व मनपा आयुक्तांना आमंत्रण
दरम्यान, कर्नाटक उच्च न्यायालयाने डिसेंबर २०२४ मध्ये दर्शनला जामीन मंजूर केला होता, परंतु कर्नाटक सरकारने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सरकारने युक्तिवाद केला होता की, उच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा आहे आणि दर्शनचा या हत्येत थेट सहभाग आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला ‘न्यायिक अधिकाराचा गैरवापर’ संबोधत गंभीर गुन्ह्यांमध्ये जामीन देणे योग्य नाही, असं म्हटलं.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. जे.बी. पारडीवाला आणि न्या. आर. महादेवन यांच्या खंडपीठाने दर्शन आणि पवित्रा गौडा यांचा जामीन रद्द केला. तसेच दर्शनला तात्काळ अटक करण्याचे आदेशही दिले आहेत. दर्शनला बेंगळुरूतून तात्काळ अटक करण्यात आली, तर पवित्रालाही तिच्या राहत्या घरातून अटक झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच होणार आहे.