इम्तियाज जलील यांच्या घरी उद्या चिकण, मटन पार्टी, CM फडणवीसांना अन् सर्व मनपा आयुक्तांना आमंत्रण

Imtiaz Jalil : 15 ऑगस्ट (August 15) स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मटण विक्री बंद (Mutton sale stopped) ठेवण्याचा निर्णय राज्यातील काही महापालिकांनी घेतलाय. यावर आता माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी आक्रमक भूमिक घेतली आहे. सरकारचा हा तुघलकी निर्णय असल्याचं म्हणत त्यांनी स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) आपल्या निवासस्थानी चिकन, बिर्याणी आणि मटन कोरमा पार्टीचे आयोजन केलंय. इतकंच नाहीतर या पार्टीसाठी त्यांनी राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही आमंत्रण देत डिवचलं.
मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख मतदारांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
राज्यातील काही महापालिकांनी १५ ऑगस्टला मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली, मालेगाव, नागपूर, अमरावती यांचा समावेश आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी या आदेशाचे स्वागत केले असताना, विरोधकांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. या निर्णयाचा विरोध करत जलील मटन पार्टीचाआयोजित केला आहे. हा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनी दुपारी १ वाजता जलील यांच्या घरी होणार आहे. जलील यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली. त्यात त्यांनी म्हटलं की, सरकारने कोणाचे खाणे-पिणे ठरवू नये, हा तुघलकी निर्णय आहे. त्यांनी या पोस्टद्वारे सरकारवर निशाणा साधत स्वातंत्र्याचा अर्थ समजावून देण्यासाठी ही पार्टी असल्याचे म्हटले आहे.
15 अगस्त को सभी मीट और चिकन की दुकानें बंद रखने का तुगलकी फरमान जारी करने वाले सभी नगर निगम आयुक्तों को 15 अगस्त को दोपहर 1 बजे मेरे आवास पर आयोजित चिकन बिरयानी और मटन कोरमा पार्टी में शामिल होने का निमंत्रण। महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis भी इस अवसर पर उपस्थित… pic.twitter.com/kFQ8etEFgf
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) August 14, 2025
आम्ही भाजपसोबत पंचवीस वर्षे फुकट घालवली ; उद्धव ठाकरेंचा घणाघात
जलील यांची पोस्ट…
जलील यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता माझ्या निवासस्थानी चिकन-बिर्याणी आणि मटण कोरमा पार्टीचे आयोजन करण्यात आलं आहे. १५ ऑगस्ट रोजी मांस आणि चिकन दुकाने बंद ठेवण्याचे तुघलकी फर्मान जारी करणाऱ्या सर्व महानगरपालिका आयुक्तांना या कार्यक्रमाचे आमंत्रण आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहतील. (भारत हा एक स्वतंत्र आणि लोकशाही देश आहे आणि महाराष्ट्र हे हुकूमशहा शासित राज्य नाही). ज्यांना अद्याप स्वातंत्र्याचा अर्थ समजलेला नाही त्यांना आठवण करून देण्यासाठी ही पार्टी आयोजित केली जात आहे, असं जलील यांनी म्हटलं.
दरम्या,न जलील यांच्या या आमंत्रणाने राजकीय वातावरण तापले असून, यावर फडणवीस काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.