Download App

Aranmanai: तमन्ना भाटियाने ‘अरनमानाई 4’ च्या फर्स्ट लूकने प्रेक्षकांचं वेधलं लक्ष 

Tamannaah Bhatia: दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) सध्या सोशल मीडियावर (Social media) कायम चर्चेत असते. तमन्ना ‘डार्लिंग’ फेम अभिनेता विजय वर्माला डेट करत असल्याच्या चर्चा खूपच रंगत होत्या. तमन्ना आणि विजयचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्या चर्चेला तिजोरा मिळाला होता.


तमन्ना भाटिया हा चेहरा असा आहे की, ज्या चेहऱ्याने केवळ दक्षिण भारतीय सिनेमाच नाही तर बॉलिवूडमध्ये (Bollywood) देखील आपल्या प्रतिभेने स्वतःची एक अनोखी ख्याती निर्माण केली आहे. सध्या ती ‘अरमानाई 4’ (Aranmanai Movie) या सिनेमाच्या फर्स्ट लूकने (First look) प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले आहे.

तसेच तेलुगूमध्ये काम करण्याच्या अगोदर 2005 मध्ये, तिने वयाच्या 15 व्या वर्षी हिंदी सिनेमा ‘चांद सा रोशन चेहरा’ या हिंदी सिनेमामधून अभिनयात पदार्पण केले आणि अभिजीत सावंतचा अल्बम ‘आपका अभिजीत’ या अल्बममधील ‘लफ्जो में’ या गाण्यामध्ये ती पहिल्यांदा बघायला मिळाली होती. जो 2005 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. त्याच वर्षी तमन्नाने श्री या सिनेमातून तेलगू सिनेमात पदार्पण केले आणि पुढच्या वर्षी ती तिच्या पहिल्या तमिळ सिनेमा केडीमध्ये बघायला मिळाली होती.

Vishal Vs CBFC: सेन्सॉर बोर्डावरील आरोपाची CBI चौकशी करा, निर्मात्याची मागणी

पुढे 2007 मध्ये तिने दोन महाविद्यालयीन जीवनावर आधारित ड्रामा सिनेमातून पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला आली होती. तेलुगूमधील हॅप्पी डेज आणि तमिळमधील कल्लूरी हे ते दोन सिनेमा तिचे खूपच गाजल्याचे बघायला मिळाले होते. तमन्नाने अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. अभिनयाव्यतिरिक्त, ती स्टेज शोमध्ये देखील भाग घेते आणि ब्रँड आणि उत्पादनांसाठी एक प्रमुख सेलिब्रिटी एंडोर्सर असल्याचे देखील सांगितले जात आहे.

तसेच तमन्ना भाटिया या उत्कंठावर्धक चित्रपटासाठी चाहते देखील मोठे उत्सुक असल्याचं बघायला मिळत आहे. तमन्नाचा आणखी एका उत्कृष्ट प्रोजेक्टची सगळेच वाट बघत आहे. तसेच जॉन अब्राहमसोबत दिग्दर्शक निखिल अडवाणीच्या ‘वेदा’ मधील तिच्या आगामी भूमिकेसाठी चाहते चांगलेच उत्सुक झाले आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज