special festival of 19 selected Marathi short films and documentaries, presented by Dadasaheb Phalke Chitranagari : मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 च्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने मराठी भाषेतील निवडक 19 लघुपट आणि माहितीपटांचा विशेष महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार, 16 जून 2026 रोजी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर उपस्थित होते.
चर्चा शिवसेनेच्या ऑपरे टायगरची अन् अलर्ट झाला राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, सर्व खासादरांना केला संपर्क
दि.16 ते 20 जून 2026 या कालावधीत हा महोत्सव रंगणार असून दररोज सायंकाळी 6.30 वाजता चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. या महोत्सवात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त झालेल्या तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवी विषयांवर भाष्य करणाऱ्या दर्जेदार मराठी लघुपट आणि माहितीपटांचे प्रदर्शन होणार आहे. चित्रपट रसिक, विद्यार्थी, अभ्यासक आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातील व्यावसायिकांना उत्कृष्ट कलाकृती अनुभवण्याची संधी या महोत्सवातून मिळणार आहे.या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मायबाचे आशिर्वाद- लघुपट, मेतकूट – लघुपट, नेहमीच – लघुपट, फड- माहितीपट हे चित्रपट दाखवण्यात आले.
माहितीपट व लघुपट वेळापत्रक खालील प्रमाणे :
बुधवार, 17 जून 2026 – संध्याकाळी 6.30
वेणी – लघुपट
जास्वंद- लघुपट
पॅम्पलेट- लघुपट
महाल्ले- माहितीपट
अर्जुन- लघुपट
गुरूवार, 18 जून 2026 – संध्याकाळी 6.30
ब्रह्मकमळ- लघुपट
गढूळ- लघुपट
डीयर 202- लघुपट
17 वे वर्ष- लघुपट
फड- माहितीपट
शुक्रवार, 19 जून 2026 – संध्याकाळी 4 ते 6
पाणखोल- लघुपट
अर्जुन- लघुपट
डोंगर पाणी-लघुपट
दारवठा‐लघुपट
शनिवार, 20 जून 2026 – संध्याकाळी 6.30
वाघ-लघुपट
सापशिडी- लघुपट
मुक्ता- लघुपट
दारवठा- लघुपट
