चर्चा शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची अन् अलर्ट झाला राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, सर्व खासादरांना केला संपर्क

शरद पवार गटाची अस्वस्थतता वाढली आहे. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अलर्ट मोडवर आला आहे.

News Photo   2026 06 17T101203.409

राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा होती. (Shiv Sena) हे ऑपरेशन टायगरबाबत आता वेगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. दिल्ली आणि महाराष्ट्रात वेगवान घडामोडी घडतायत. ऑपरेशन टायगर सक्रीय झालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाणार आहेत. केंद्रात मोदी सरकारला पाठिंबा देणार आहेत. हे सगळ घडत असताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटातून महत्वाची बातमी समोर आली आहे.

शरद पवार गटाची अस्वस्थतता वाढली आहे. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अलर्ट मोडवर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांना पक्षाकडून संपर्क साधला जात आहे. पुढील एक-दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची बैठक होईल अशी सूत्रांची माहिती आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत शरद पवार पक्षाचे आठ खासदार निवडून आलेले आहेत.

follow us