चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांना खास आदरांजली! १२५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Chitrapati Dr. V. Shantaram यांच्या १२५व्या जयंती निमित्त कोल्हापूर, पुणे आणि मुंबईमध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Chitrapati Dr. V. Shantaram

Chitrapati Dr. V. Shantaram

Special tribute to Chitrapati Dr. V. Shantaram! Various programs organized on the occasion of his 125th birth anniversary : अयोध्येचा राजा, माणूस, कुंकू, झनक झनक पायल बाजे, डॉ. कोटनीस की अमर कहानी, दो आँखे बारा हाथ, नवरंग, पिंजरायांसारखे अजरामर चित्रपट निर्माण करणाऱ्या चित्रपती डॉ. व्ही. शांताराम ज्यांनी मराठी आणि हिंदीमधील ९२ चित्रपटांची निर्मिती, ५५ चित्रपटांचे दिग्दर्शन आणि २५ चित्रपटांमध्ये कलाकार म्हणून काम केले आहे यांचे १२५वे जयंती वर्ष येत्या १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरु होत आहे.

अनगर नगर पंचायतीत भारतीय जनता पार्टीचे 17 पैकी 17 नगरसेवक बिनविरोध; काय घडलं?

१२५व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने डॉ. व्ही. शांताराम यांची कारकीर्द जिथे बहरली त्या कोल्हापूर, पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. जानेवारी मध्ये मुंबईठाणे येथे होणाऱ्या आशियाई चित्रपट महोत्सवात डॉ. व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांचा विशेष विभाग असणार आहे तसेच प्रभात चित्र मंडळ आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया या संस्था डॉ. व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांचे विशेष शो आयोजित करणार आहेत.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना फाशीची शिक्षा सुनावली; 2024 चं हिंसाचार प्रकरण नेमकं काय?

तसेच या १२५व्या जयंती वर्षानिमित्त गोव्यात आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डॉ. व्ही. शांताराम निर्मितडॉक्टर कोटनीस की अमर कहानी (१९४६)’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे आणि महोत्सवाच्या सांगता समारंभात डॉ. व्ही. शांतारामांचे चित्र असलेल्या पोस्ट स्टॅम्पचे अनावरण करण्यात येणार आहे.

Exit mobile version