Spider-Man Brand New Day : टॉम हॉलंडच्या अलीकडील भारत भेटीमुळे चाहत्यांमधील त्याच्याबद्दलचे प्रेम पुन्हा जागृत झाले असले, तरी आता त्याच्या ‘स्पायडर-मॅन’च्या भूमिकेतील पुनरागमनाची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. ‘प्रीमियम लार्ज फॉरमॅट’ (PLF) आणि ‘4DX’ बुकिंगला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर, आता देशभरातील चित्रपटगृहांमध्ये ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’च्या आगाऊ बुकिंगला (ॲडव्हान्स बुकिंग) सुरुवात झाली आहे.
भारतातील कोणत्याही चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सुरुवातीच्या काळात मिळालेला हा आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त प्रतिसाद ठरत आहे, विशेषतः प्रीमियम फॉरमॅटमधील शोसाठी अभूतपूर्व मागणी दिसून येत आहे. या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढवणारी बाब म्हणजे याची नवी निर्मिती-दृष्टी (creative vision); यात दिग्दर्शक डेस्टिन डॅनियल क्रेटन (Destin Daniel Cretton) हे पीटर पार्करच्या प्रवासातील पुढील भागाचे दिग्दर्शन करत आहेत.
‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’मध्ये टॉम हॉलंड, झेंडाया, जेकब बॅटालॉन, जॉन बर्नथल आणि सॅडी सिंक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ३० जुलै २०२६ रोजी भारतात इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये तसेच 2D, 3D आणि प्रीमियम फॉरमॅट्समध्ये प्रदर्शित होणार आहे.
नीट परीक्षा निकाल, पुन्हा लातूर पॅटर्नची चर्चा; 1500 विद्यार्थी MBBS होणार?-
