‘Spider-Man: Brand New Day’ puts up a strong performance in India; crosses the ₹550 crore mark : Sony Pictures Entertainmentच्या ‘Spider-Man: Brand New Day’ या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल 550 कोटी रुपयांच्या ग्रॉस कमाईचा टप्पा पार केला आहे. या शानदार यशातून भारतातील प्रेक्षकांमध्ये स्पायडर-मॅनची लोकप्रियता आजही कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
अधिकृत व्हिडीओ पाहा
चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनेक चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल्ल शो पाहायला मिळाले. चाहत्यांनी स्पायडर-मॅनच्या आगमनाचा उत्साहात जल्लोष केला, तर सोशल मीडियावरही चित्रपटाची जोरदार चर्चा झाली. विविध पिढ्यांमधील स्पायडर-मॅन चाहत्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चित्रपटाचा थिएटरमधील प्रवास एका मोठ्या सेलिब्रेशनमध्ये बदलला आहे.
भारतामध्ये स्पायडर-मॅनने सर्वाधिक लोकप्रिय हॉलीवूड सुपरहिरोंपैकी एक म्हणून आपली पकड आणखी मजबूत केली आहे. या यशानिमित्त Sony Pictures Indiaने देशभरातील चाहत्यांचे विशेष आभार मानले. चाहत्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला ज्या पद्धतीने उत्सवाचे स्वरूप दिले, त्याची झलकही या खास शो-रीलमध्ये पाहायला मिळते. विशेष म्हणजे, टॉम हॉलंडच्या भारत दौऱ्यादरम्यान मुंबईतील एका हॉटेलबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. आपल्या आवडत्या स्पायडर-मॅन अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी केलेली गर्दीही या सेलिब्रेशनचा खास भाग ठरली.
बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रमांची नोंद
‘Spider-Man: Brand New Day’ने भारतात कमाईचे अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. हा चित्रपट भारतात प्रदर्शित झालेला सर्वाधिक कमाई करणारा हॉलीवूड चित्रपट ठरला आहे. याशिवाय ५०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा तो एकमेव हॉलीवूड चित्रपट ठरला आहे. स्पायडर-मॅनच्या या चित्रपटाला भारतातील प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद अद्याप कायम असून, अनेक शहरांमधील चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाचे शो यशस्वीपणे सुरू आहेत. सध्या इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये ‘Spider-Man: Brand New Day’ भारतभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
